मराठी बातम्या /बातम्या /Viral /Yuck! कांदा, बटाटा, मिरची नव्हे तर पालीची भजी; Pakora packet मध्ये Fried Lizard

Yuck! कांदा, बटाटा, मिरची नव्हे तर पालीची भजी; Pakora packet मध्ये Fried Lizard

तरुणाने भजीचं पाकीट खोलताच बसला धक्का.

तरुणाने भजीचं पाकीट खोलताच बसला धक्का.

तरुणाने भजीचं पाकीट खोलताच बसला धक्का.

चेन्नई, 28 ऑक्टोबर : तुम्ही चिप्स किंवा इतर स्नॅक्सचं (Snacks) पाकीट खरेदी केलं. पाकिटात हात घालून घालून तुम्ही ते खात आहात. पण अचानक पाकिटातून तुम्हाला पाल (Lizard) सापडली तर, तीसुद्धा तळलेली पाल. काय झालं? अंगावर काटा आला ना, उलटीसारखंसुद्धा वाटतं आहे ना. पण एका व्यक्तीच्याबाबतीत हे प्रत्यक्षात घडलं. त्याला भजीच्या (Pakora)  पाकिटात चक्क तळलेली पाल मिळाली आहे (Fried Lizard in Pakora packet).

तामिळनाडूतील  (Tamil Nadu) एका तरुणाने भजीचं पाकीट खरेदी केलं. तिरुवेवलेली जिल्ह्यातील  पलायमकोट्टाईतील एका दुकानातून त्याने 23 ऑक्टोबरला ही भजी खरेदी केली. घरी जाईन त्याने पाकीट खोललं तर त्यात चक्क तळलेली पाल होती.  न्यूज 18 कर्नाटच्या रिपोर्टनुसार, तरुणाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडे  (FSSAI)  याची तक्रार केली.

हे वाचा - एका पालीची दहशत! भीतीने काम सोडून पळाले कर्मचारी; अख्खं ऑफिस रिकामं झालं

त्यानंतर एफएसएसएआयचे अधिकाऱ्यांची एक टीम संबंधित दुकानात गेली. तिथं नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसलं. खाद्यपदार्थ नीट ठेवलेले नव्हते. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार ज्या भजीच्या पाकिटात पाल सापडली तशी पाकिटं तिथं नव्हती. इतर स्नॅक्सचे नमुने अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले.

एखाद्या पदार्थामध्ये पाल सापडल्याची ही पहिला घटना नाही. याआधीसुद्धा अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. महाराष्ट्रातही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत.

नोव्हेंबर 2018 - नांदेडमध्ये साखरपुड्याच्या जेवणात पाल पडली होती. त्यानंतर  45 जणांना विषबाधा झाली.   बटाट्याच्या भाजीत पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले. किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथे ही घटना घडली होती.

मे 2019 - नागपूरच्या बुटीबोरी इथल्या मोरारजी कंपनीतल्या  20 कामगारांना विषबाधा झाली. या कामगारांच्या जेवणात पाल आढळल्याने त्यातून विषबाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

जुलै 2019 - माजी आमदाराच्या पाण्याच्या बाटलीत चक्क पाल आढळली आहे. विशेष म्हणजे नामांकित कंपनी बेलीच्या बाटलीत ही पाल आढळल्यानं खळबळ उडाली होती.

हे वाचा - ऑनलाईन ऑर्डर केलेल्या Domino's पिझ्झामध्ये आढळलं भलतंच काही; पाहूनच चक्रावली महिला

त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर किंवा ते खाताना सावध राहा आणि असं काही आढळल्यास त्याबाबत लगेच तक्रार करा.

First published:

Tags: Food, Tamilnadu