VIDEO पाहून किळस येईल! बिअरच्या ग्लासात पडलेल्या पालीला वाचवण्यासाठी केला कहर

VIDEO पाहून किळस येईल! बिअरच्या ग्लासात पडलेल्या पालीला वाचवण्यासाठी केला कहर

पाल (Lizard) पाहिली तरी किळसवाणं वाटतं, मात्र ऑस्ट्रेलियातील व्यक्तीने (australian man) बिअरमध्ये पडलेल्या पालीला तोंडाने सीपीआर (Mouth CPR) देऊन तिचा जीव वाचवला आहे.

  • Share this:

कॅनबेरा, 19 फेब्रुवारी : पाल (Lizard) दिसली तरी अगदी कसंतरीच होतं, त्यात तुमच्यासमोर असलेल्या एखाद्या पेयात किंवा पदार्थात पाल असल्याचं दिसली, तर तुम्ही तुमच्या जीवाचा विचार करता आणि ते पेय किंवा पदार्थच फेकून देता. मात्र ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीच्या बिअरमध्ये पाल पडली आणि या पठ्ठ्याने तिला वाचवण्यासाठी चक्क तिला आपल्या तोंडाने श्वास दिला आहे.

The Today Show ने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पालीला आपल्या तोंडाने सीपीआर (Mouth CPR) देतो आहे.

ऑस्ट्रेलियातील (Australia) न्यू साऊथ वेल्समधील कॉरिन्डी बीचवरील द अम्बे इनमध्ये ही घटना घडली आहे. ब्रेट नावाची ही व्यक्ती इथं बिअर पिण्यासाठी आली होती. त्यावेळी त्याला बिअरच्या ग्लासात पाल दिसली. सुरुवातीला त्याला ही पाल खोटी असल्याचं वाटलं, मात्र जेव्हा ही पाल खरी आहे, असं त्याला समजलं तेव्हा त्याने थेट त्या पालीला वाचवण्यासाठी तिला भरलेल्या बिअरच्या ग्लासातून बाहेर काढलं. इतक्यावरच ती व्यक्ती थांबली नाही, तर थेट आपल्या तोंडात पालीचं तोंड घेऊन त्याने तिला सीपीआर (CPR) दिला, तिला उलटं करून तिच्या पोटावर बोट फिरवलं. यानंतर मृतावस्थेत असलेल्या या पालीमध्ये चक्क जीव आला, ती हालचाल करू लागली.

एखाद्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी सीपीआर दिला जातो. यामध्ये तोंडाने श्वास दिला जातो, शिवाय छातीवर दाब दिला जातो. मात्र प्राण्यांना सीपीआर देण्याच्या घटना क्वचितच आढळतात. त्यातही पाल म्हटलं तर सीपीआर देण्याचा विचार तर लांबच मात्र या व्यक्तीने ते केलं. त्यामुळे त्याला रिअल हिरो म्हणत त्याच्यावर कौतुकांचा वर्षावर करण्यात आला आहे.

First published: February 19, 2020, 9:21 PM IST
Tags: CPRlizard

ताज्या बातम्या