• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Video: देव तारी त्याला कोण मारी! भरधाव बसनं उडवलं तरी सेकंदात उभा राहून चालू लागला युवक

Video: देव तारी त्याला कोण मारी! भरधाव बसनं उडवलं तरी सेकंदात उभा राहून चालू लागला युवक

एक व्यक्ती एकदम आरामात रस्त्याच्या कडेनं जात आहे. इतक्यात वेगात मागून एक बस (Bus) येते. इतकंच नाही तर ही बस या व्यक्तीला जोरदार धडक देते.

 • Share this:
  नवी दिल्ली 23 जुलै : देव तारी त्याला कोण मारी, असं आपण अनेकदा म्हणतो किंवा ऐकतो. मात्र, काहीवेळा या गोष्टीचा प्रयत्ययही आपल्य़ाला येतो. अनेकदा अशा काही घटना समोर येतात ज्यात व्यक्ती अगदी मृत्यूच्या दारातून परत येतो. सध्या असाच एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. यात एका व्यक्तीसोबत जे काही घडलं ते पाहता त्याच्या वाचण्याची काहीही आशा नव्हती. मात्र, जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral on Social Media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तरुणीच्या बेबी बम्पच्या आकाराची सोशल मीडियावर चर्चा; कारण ऐकून हैराण व्हाल! हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण ही घटनाच काहीशी अशी आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती एकदम आरामात रस्त्याच्या कडेनं जात आहे. इतक्यात वेगात मागून एक बस (Bus) येते. इतकंच नाही तर ही बस या व्यक्तीला जोरदार धडक देते. या अपघातानंतर (Road Accident) हा व्यक्ती जमिनीवर कोसळतो. मात्र, पुढच्याच क्षणी जे घडतं ते पाहून तुम्हीही म्हणाल, की काय नशीब आहे. पुढे काय घडलं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. VIDEO:असा धोका पत्करू नका! पुराच्या पाण्यात वाहून जात असतानाही दुचाकी सोडेना हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आला असेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ ‘@RexChapman’ नं शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत 9 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले असून यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं, हे कमेंट करून नक्की सांगा.
  Published by:Kiran Pharate
  First published: