हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे माहिती नाही. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो पोस्ट करण्यात आला आहे. पण अशी घटना कधीही, कुठेही घडू शकतो. त्यामुळे आपण सावध राहायला हवं, काळजी घ्यायला हवी. हेच या व्हिडीओतून समजतं. वीज चमकत असताना दुर्घटना टाळण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी? विजा चमकत असतानाच्या काळात काय काळजी घेणं आवश्यक आहे, याची माहिती अमेरिकेच्या 'सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन' या संस्थेच्या (CDC) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. कोणीही घराबाहेर असताना वादळासारखी स्थिती निर्माण झाली किंवा विजा चमकायला लागल्या, तर तातडीने कुठल्याही घरात किंवा बंदिस्त इमारतीत आसरा घ्यायला हवा; मात्र झाडाखाली अजिबात जाऊ नये. बंदिस्त वाहन किंवा कारमध्ये असाल, तर बाहेर येऊन नये. कारण कारचे टायर्स रबराचे असल्याने वीज घातक ठरत नाही. मात्र वाहनाच्या काचा बंद ठेवण्याची काळजी घ्यावी. कुठेही आसरा घेणं शक्य नसेल, तर उंच डोंगरासारख्या ठिकाणी जावं. हे वाचा - Explainer: आकाशात कशी होते वीज तयार?, काय आहे त्यामागचं विज्ञान विजा कडकडताना गटाने राहू नये. एकमेकांमध्ये अंतर ठेवावं. काँक्रीटच्या जमिनीवर राहू नये किंवा काँक्रीटच्या भिंतींना स्पर्श करू नये. त्यातल्या धातूंमधून वीजप्रवाह वाहू शकतो. कोणत्याही परिस्थितीत जमिनीवर आडवं झोपू नये. कानावर हात घेऊन डोकं दोन पायांमध्ये घेऊन चेंडूसारखं बसावं. जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल, अशा पद्धतीने बसावं. उंच भिंतींना टेकून राहू नये. अशा वेळी पाण्यात पोहत असाल, तर तातडीने बाहेर यावं. वीजप्रवाह ज्यातून वाहू शकतो, अशा गोष्टींना स्पर्श करू नये. उदा. तारेचं कुंपण किंवा धातूच्या कोणत्याही वस्तू कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणं (Electronic Gadgets) वापरू नये. लँडलाइन फोन्स वापरू नयेत. घरातल्या इलेक्ट्रिक वायरिंगच्या वेळी अर्थिंग (Earthing) नीट असेल, याची काळजी घ्यावी. तसंच, वीज पडलीच, तर ती इमारतीच्या स्ट्रक्चरमधून प्रवाहित होण्याऐवजी वायरमधून प्रवाहित होण्यासाठी घरावर लायटनिंग रॉडही लावता येतो. अर्थात हे उपाय ऐन वेळी करण्याचे नाहीत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Rain, Viral, Viral videos