Home /News /viral /

कॅमेऱ्यात कैद झालेलं ते भूत की...; रिअल Horror video पाहून फुटेल घाम

कॅमेऱ्यात कैद झालेलं ते भूत की...; रिअल Horror video पाहून फुटेल घाम

एका पडीक घरात हे लोक घुसले खरे पण...

    मुंबई, 25 जून: एखादा बंगला, जुना वाडा किंवा घर खूप वर्षापासून पडीक आहे. तिथं कुणीच राहत नाही. घराची अवस्थाही पाहण्यासारखी नसते. अशा घरांकडे पाहिलं की इथं फक्त भूतच (Ghost video) राहत असावीत असं वाटतं. काही तरुण-तरुणी तर उत्सुकता म्हणा, हौस म्हणा किंवा मजा म्हणून अशा हंटेड हाऊसमध्ये (Haunted house) जातात. अशी भूत असलेली घरं तुम्ही हॉरर फिल्ममध्ये (Horror Film) बरीच पाहिली असतील पण अशाच एका रिअल घराचा व्हिडीओ (Horror Video) सोशल मीडियावर  (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. काही जण भूतावर (Horror Story) विश्वास ठेवतात तर काही नाही. पण हॉरर फिल्ममध्ये भूत पाहिल्यावर किती तरी जणांना घाम फुटतो. एखादा फिल्मी सीन वाटावा असाच हा रिअल सीन आहे. कुणीच राहत नसलेल्या एका घरातील भूत कॅमेऱ्यात कैद झालं आहे. द सनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता, एक जिना आहे, तिथं काहीतरी एक विचित्र आकृती दिसते. हे पाहून त्या घरात आलेले लोक शॉक होतात. हे वाचा - अरे बापरे, हा कशाचा प्रकाश? एलियन तर नाही? गुजरातचं आकाश अचानक उजळलं, पाहा VIDEO हातात टॉर्च घेऊन आणि कॅमेरा सुरू करून या व्यक्ती घरात सर्वत्र पाहत असतात. ते जिन्यावरून वर जात असतात तेव्हा त्यांना जिन्याच्या वर एक आकृती दिसते. तिथं लाइट जातातच ती आकृती बाजूला होते. या लोकांना तिथं विचित्र आवाजही ऐकू येतो. ते पाहून ते घाबरतात आणि शांतच होतात. ही आकृती नेमकी कसली होती हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी ते लोक जिन्यावर जातात. पण तिथं कुणीच दिसत नाही. व्हिडीओत पाहू शकता तिथं काहीच नाही आहे आणि तिथून कुठे जाण्यासाठी दुसरी जागाही दिसत नाही आहे. हे वाचा - भूत की आणखी काही? चिमुरडीचा हा VIDEO पाहून तुम्हाला दरदरून फुटेल घाम द सनच्या रिपोर्टनुसार हे लोक कित्येक वर्षांपासून पडीक असलेल्या या केअर होममध्ये गेले होते. किती तरी वर्षापासून ही जागा अशीच रिकामी आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Horror, Shocking video viral, Viral, Viral videos

    पुढील बातम्या