मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अद्भुत! अचानक जिवंत झाले बुद्धिबळाच्या पटावरील 'मोहरे'; कधीच पाहिला नसेल असा Live Chess Video

अद्भुत! अचानक जिवंत झाले बुद्धिबळाच्या पटावरील 'मोहरे'; कधीच पाहिला नसेल असा Live Chess Video

बुद्धिबळाचा लाइव्ह खेळ तुम्ही पाहिला असेल पण विचार करा बुद्धिबळच जिवंत झाला तर...

बुद्धिबळाचा लाइव्ह खेळ तुम्ही पाहिला असेल पण विचार करा बुद्धिबळच जिवंत झाला तर...

बुद्धिबळाचा लाइव्ह खेळ तुम्ही पाहिला असेल पण विचार करा बुद्धिबळच जिवंत झाला तर...

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 01 ऑगस्ट : चेस किंवा बुद्धिबळ ज्याचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण याच खेळाचा एक हैराण करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बुद्धिबळाच्या पटावरील मोहरे अचानक जिवंत झाले आणि खेळू लागले. बुद्धिबळाचा असा खेळ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल. व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. बुद्धिबळाचा लाइव्ह खेळ तुम्ही पाहिला असेल पण विचार करा बुद्धिबळच जिवंत झाला तर... ही कल्पना प्रत्यक्षात उतरली तर काय होईल ते तुम्ही तुमच्याच डोळ्यांनी पाहा. व्हिडीओत पाहू शकता बुद्धिबळ पट दिसतो आहे. त्यावर मोहरे बसलेले आहेत. पण हे मोहरे कुणी चालवत नाही आहे तर आपोआपच चालत आहेत. तुम्हाला पाहून आश्चर्य वाटेल तर हे मोहरे जिवंत आहेत. व्हिडीओत पाहू शकता जशी बुद्धिबळात चाल किंवा डाव खेळला जातो. एकेएक करून मोहरे पुढे येतात. तसेच इथंही दिसतं. बॅकग्राऊंड म्युझिकपासून ते डान्स, मुद्रा आणि चेहऱ्यावरील हावभाव सर्वकाही भारावून टाकणारं आहे. तामिळनाडूच्या चेन्नईत सुरू असलेल्या 44 व्या चेल ओलंपियाडला वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट केलं जातं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पुदुक्कोट्टईच्या जिल्हाधिकारी कविता रामू यांनी जिवंत बुद्धिबळाचा खेळ दाखवला. जिवंत बुद्धिबळाच्या खेळाचा विचार करण्यापासून तो कोरियोग्राफी करून प्रत्यक्ष साकारण्यापर्यंत सर्वकाही कविता रामू यांनीच केलं आहे. हे वाचा - OMG! तरुणाने स्वतःच्या शरीरावर सपासप फिरवली तलवार; अंगावर काटा आणणारा VIDEO बिझनेसमेन आनंद महिंद्रासुद्धा हा खेळ पाहून भारावले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा जिवंत बुद्धिबळ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या