मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! खेळता खेळता चिमुकलीने मानेभोवती गुंडाळला जिवंत साप; अंगावर काटा आणणारा VIDEO

बापरे! खेळता खेळता चिमुकलीने मानेभोवती गुंडाळला जिवंत साप; अंगावर काटा आणणारा VIDEO

जिवंत साप मानेभोवती गुंडाळणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

जिवंत साप मानेभोवती गुंडाळणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

जिवंत साप मानेभोवती गुंडाळणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 31 मे : लहान मुलं खेळताना त्यांच्या हाताला लागेल किंवा डोळ्यासमोर दिसेल ती वस्तू उचलतात. त्यांच्यासाठी सर्वकाही खेळणंच असतं. अशाच एका चिमुकलीने खेळता खेळता चक्क जिवंत सापच हातात धरला (Child playing with snake video). इतकंच नव्हे तर तिने तो साप आपल्या गळ्याभोवतीही गुंडाळला. अंगाचं पाणी पाणी करणारा असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Snake in girl hand). साप म्हटलं की मोठ्या माणसांच्याही अंगाला दरदरून घाम फुटतो (Snake video viral on social media). सापही माणूस जवळ दिसताच आपल्या बचावासाठी हल्ला करतात किंवा दंश करतात. अशा खतरनाक सापाला पाहून एका चिमुकलीने मात्र त्याला हातात धरलं. त्याची शेपटी आपल्या एका हातात पकडून त्याला उचललं आणि आपल्या गळ्याभोवती गुंडाळलं. व्हिडीओत पाहू शकता गळ्याभोवती साप गुंडाळलेली ही चिमुकली. तिला पाहून आपल्याला धडकी भरते. पण तिच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही. एखादं खेळणं असावं असं बिनधास्तपणे जिवंत साप तिने आपल्या हातात धरला आहे आणि निवांत एका ठिकाणी एकटक पाहते आहे.
View this post on Instagram

A post shared by Ariana (@snakemasterexotics)

आश्चर्य म्हणजे सापही शांत आहे. मुलीने त्याची शेपटी धरली तरी तो तिच्यावर हल्ला करताना दिसत नाही आहे. सापाचं तोंड जमिनीच्या दिशेने आहे, पण तरी तो चिमुकलीच्या हातातून सुटण्यासाठी वगैरे धडपड करताना दिसत नाही आहे. @snakemasterexotics इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. एकंदर व्हिडीओ पाहता हा साप पाळलेला असावा असं दिसून येतं आहे. पण लहान मुलांना पालकांनी अशा खरतनाक प्राण्याच्या संपर्कात ठेवल्याने लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत. चिमुकलीबाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. हे वाचा - Shocking! चिमुकलीने भल्यामोठ्या सापाची शेपटी धरून खेचलं आणि...; धडकी भरवणारा VIDEO सापासोबत खेळणारी ही एकमेव चिमुकली नाही. असे लहान मुलांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ही मुलं सापच नव्हे तर महाकाय अजगरांसोबतही खेळताना दिसतात. आता हा व्हिडीओ पाहा ज्यात 6-7 वर्षाची लहान मुलगी 20 फूटाहून लांब भल्यामोठ्या अजगरासोबत खेळताना दिसत आहे.
हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंट snake._.world वरुन शेअर केला गेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की 6-7 वर्षाची चिमुकली खाली बसलेली आहे. इतक्यात समोरून 20-22 फूट लांब अजगर येतो. एवढा मोठा अजगर समोर आल्यावर कोणाचाही थरकाप उडेल. मात्र ही चिमुकली अजिबातही घाबरत नाही. यानंतर जे काही होतं ते पाहून सगळेच हैराण झाले. हे वाचा - VIDEO - गाढ झोपलेल्या व्यक्तीला 2 महाकाय अजगरांनी घातला विळखा; भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद तुम्ही पाहू शकता की ही चिमुकलीच अजगराचा रस्ता अडवते आणि त्याच्या समोर उभा राहते. या चिमुकलीच्या जिद्दीपुढे अजगरही माघार घेताना दिसतो. तो या चिमुकलीला काहीही न करता आपला रस्ता बदलतो आणि दुसरीकडून जाऊ लागतो.
First published:

Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos

पुढील बातम्या