Home /News /viral /

ही 10 वर्षाची चिमुकली आहे करोडोंची मालकीण; लहान वयातच सुरू केला व्यवसाय, 15 व्या वर्षी घेणार रिटायरमेंट

ही 10 वर्षाची चिमुकली आहे करोडोंची मालकीण; लहान वयातच सुरू केला व्यवसाय, 15 व्या वर्षी घेणार रिटायरमेंट

पिक्सी सध्या प्रायमरी स्कूलमध्ये शिकते. मात्र तिची Pixie’s Fidgets नावाची एक कंपनीही आहे. यातून ती करोडो रुपयांची कमाई करते

    नवी दिल्ली 06 डिसेंबर : 10 वर्ष वय असणारी मुलं काय विचार करत असतील? सामान्य मुलं या वयात खेळण्याचे आणि अभ्यासाचे प्लॅन बनवतात. काही मुलं या वयात आपलं करिअर ठरवतात. मात्र, एक चिमुकली अशीही आहे जी या वयातच करोडोंची मालकीण आहे. पिक्सी कर्टिस नावाच्या या मुलीने अगदी लहान वयातच स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे (Little Girl Started Own Business) आणि आता तिला आपल्या भविष्याबद्दल काहीच चिंता नाही. ऑस्ट्रेलियाची रहिवासी असलेली पिक्सी सध्या प्रायमरी स्कूलमध्ये शिकते. मात्र तिची Pixie’s Fidgets नावाची एक कंपनीही आहे. यातून ती करोडो रुपयांची कमाई करते (10 Year Old Girl Earn 1 Crore in a Month) . या कामात तिची आई रॉक्सीही तिची मदत करते. ती स्वतःही पब्लिक रिलेशन्स मॅनेजर आहे. आई रॉक्सी आणि मुलगी पिक्सी यांनी मे महिन्यात टॉय बिझनेस सुरू केला आहे. त्यांची सर्व खेळणी 48 तासाच्या आतच विकली गेली होती आणि हे त्यांना मिळालेलं पहिलं यश होतं. रॉक्सीने सांगितलं की कंपनीचा पहिल्या महिन्याचा टर्नओव्हर 1 कोटीहून अधिक होता. यानंतर पिक्सीच्या कंपनीमार्फत हेअर अॅक्सेसरी ब्रँडही तयार केला गेला. याचं नाव Pixie’s Bows असं ठेवण्यात आलं. खेळणी आणि हेअर अॅक्सेसरीजचे ब्रँड Pixie’s Pixs नावाच्या मदर कंपनीच्या अंडर येतात. यात खेळणी, कपडे आणि अॅक्सेसरीज विकल्या जातात. या सर्वावर दहा वर्षाच्या पिक्सीचं अॅप्रूवल असतं. पिक्सीची आई रॉक्सीही यशस्वी पब्लिश रिलेशन्स मॅनेजर आहे आणि लहान मुलांना महागडी गिफ्ट्स आणि कपडे दिल्याने चर्चेत आलेली आहे. तिचं असं म्हणणं आहे की तिने पिक्सीसाठी हे सर्व यासाठी केलं की तिला पंधरा वर्ष वयातच रिटायर होता यावं. ती सांगते की एवढ्या लहान वयातच पिक्सीची बिझनेस करण्याची इच्छा होती आणि माझ्या मदतीने तिने यात यश मिळवलं. रॉक्सी स्वतः Sweaty Betty PR नावाचा बिझनेस चालवते. यात तिचा पतीही तिची साथ देतो. आपल्या महागड्या आणि शाही लाईफस्टाईलमुळे ती अनेकदा चर्चेत असते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Business, Viral news

    पुढील बातम्या