मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आईच्या सुरात लेकीचा सूर; चिमुकलीचं गोड गाणं ऐकून म्हणाल SO CUTE

आईच्या सुरात लेकीचा सूर; चिमुकलीचं गोड गाणं ऐकून म्हणाल SO CUTE

एका गोंडस आणि तितक्याच टॅलेंटेड चिमुकलीचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. अवघ्या तीन वर्षाच्या या चिमुरडीने अतिशय ताला-सुरात तिच्या आईसोबत गायलेलं गाणं चर्चेचा विषय ठरत आहे.

  मुंबई, 17 फेब्रुवारी : सोशल मीडियावर लहान मुलाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या इंटरनेट, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या जमान्यात छोटीशी गोष्यही काही वेळातच सर्वांपर्यंत तुफान व्हायरल होते. अशाच एका गोंडस आणि तितक्याच टॅलेंटेड चिमुकलीचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. अवघ्या तीन वर्षाच्या या चिमुरडीने अतिशय ताला-सुरात तिच्या आईसोबत गायलेलं गाणं चर्चेचा विषय ठरत आहे. या चिमुकलीचा आणि तिच्या आईचा 'कबीर सिंग' चित्रपटातील गाण्याचा एक वर्षापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघी 'दिल का दर्या' हे गाणं गाताना दिसतात. तिच्या आईने गाण्याची ओळ गायल्यानंतर, ती चिमुकलीही आईच्या मागे गाण्याच्या पुढच्या ओळी गाते. इतक्या ताला-सुरात गाणाऱ्या या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचं सर्वत्र कौतुक होत आहे. तिने लावलेला सूर पाहून सर्वच जण हैराण आहेत.
  या चिमुकलीचं Pragya Medha नावाने एक इन्स्टाग्राम अकाउंट आहे. तिची आई या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. यापूर्वी तिने 'लग जा गले' हे गाणंही अतिशय सुरात, त्याच तालात गायलं होतं. या चिमुकलीला केवळ चित्रपटातील गाणीचं नाही तर तिला अनेक श्लोकही पाठ आहेत.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Viral videos

  पुढील बातम्या