मुंबई, 17 जुलै : स्कूल होमवर्क (School homework) म्हणजे लहान मुलांच्या डोक्याला एक मोठा तापच असतो. आपणसुद्धा शाळेत असताना आपल्याला स्कूल होमवर्क (Homework) नसता तर बरं झालं असतं असंच वाटायचं. सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे (Corona lockdown) गेले काही महिने शाळा बंद (School closed) होत्या. त्यामुळे ऑनलाइन स्कूल (Online school) सुरू होते. अगदी शिकवण्यापासून ते परीक्षेपर्यंत सर्व काही ऑनलाइन. या ऑनलाइन शाळेतही होमवर्कपासून काही सुटका झाली नाही. पण एका चिमुकलीने मात्र सॉलिड जुगाड केला आणि स्कूल होमवर्कपासून आपली सुटका करून घेतली आहे (Little girl jugaad for not getting homework).
ऑनलाइन स्कूलमुळे मुलांच्या हातात त्यांचा आवडता मोबाइल, लॅपटॉप किती तरी वेळेसाठी मिळू लागला. पण इतका वेळ शाळा आणि त्यानंतर होमवर्क त्यामुळे मुलांवरील भारही वाढला. किमान या होमवर्कपासून तरी आपली सुटका व्हावी यासाठी चिमुकलीने प्रयत्न केला. तिने असं काही केलं ज्यामुळे तिला आता शाळेचा होमवर्क कधीच येत नाही.
View this post on Instagram
होमवर्क न मिळण्यावर सोल्युशन देणाऱ्या या निरागस चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
हे वाचा - इवल्याशा हातांनी भरभर चिरतो भाजी; चिमुकल्या शेफचा VIDEO पाहून तुम्हीही हैराण व्हाल
या मुलीच्या निरागस चेहऱ्यावर बिलकुल जाऊ नका बरं का. या चेहऱ्यामागे असा मस्तीखोर चेहरा दडला आहे, ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. जे इतके वर्षे कुणालाच जमलं नाही ते या चिमुकलीने असं एका चुटकीत केलं आहे. तिने शिक्षकाने होमवर्क देऊ नये, यासाठी एक उपाय शोधला, तो अवलंबला आणि इतरांना हा परफेक्ट मार्ग सांगितला.
होमवर्क न मिळण्यासाठी नेमका काय जुगाड केला हे स्वतः या चिमुकलीने व्हिडीओतून सांगितलं आहे. शनाया कंबोज असं या मुलीचं नाव आहे. व्हिडीओत तुम्ही ऐकू शकता. कुणी तरी तिला विचारतं शनाया तुला शाळेतून किती होमवर्क मिळतो. ती अगदी निरागसपणे या प्रश्नाचं उत्तर देत. आपल्याला होमवर्क मिळतच नाही कारण आपण टिचरला ब्लॉक केलं आहे.
हे वाचा - ‘बसपन’ का प्यार कभी भूल नही जाना रे, चिमुरड्याच्या ‘लव्ह सॉंग’ला लाखो हिट्स
काय तुम्ही शॉक झालात ना? तुमच्याप्रमाणेच बहुतेक जणांना चिमुकलीचा हा अजब जुगाड पाहून धक्का बसला आहे. पण तिने सर्वांचं मनही जिंकून घेतलं आहे. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट केल्या जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Social media viral, Viral, Viral videos