पुन्हा पुन्हा बघावा वाटेल चिमुकलीचा 'क्लासिकल डान्स', VIDEO VIRAL

पुन्हा पुन्हा बघावा वाटेल चिमुकलीचा 'क्लासिकल डान्स', VIDEO VIRAL

सोशल मीडियावर नेहमीच डिजे, रिमिक्स गाण्यावर डान्स करत असलेल्या लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता क्लासिकल डान्स करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणत लहान मुलांमधील गुणांच कौतुक केलं जातं. अलिकडे टीव्ही चॅनेलवरून अनेक रिअॅलिटी शो घेतले जातात. यामध्ये लहान मुलांना त्यांचे गायनाचे किंवा नृत्यकौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळते. तरीही सध्या सोशल मीडिया हे एक असं माध्यम झालं आहे जिथं एखाद्यामध्ये असेलला कलागुण लपून राहत नाही. ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर रानू मंडल यांचं घ्यावं लागेल. एका व्हिडिओनं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक चिमुकली भारतीय शास्त्रीय संगीतावर नृत्य करताना दिसत आहे. इतक्या लहान वयातही तिचं नृत्यकौशल्य थक्क करणारं असंच आहे. विशेष म्हणजे हे नृत्य ती सहजपणे करते आणि तिच्यावर साक्षात सरस्वतीचाच आशीर्वाद असल्यासारखं वाटतं.

रिमिक्स गाणी, डीजेच्या तालावर लहान मुलं डान्स करत असेलले अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण शास्त्रीय संगीतावर या वयात तालात सुरू असलेलं चिमुकलीचं हे नृत्य जबरदस्त आहे. शास्त्रीय नृत्यात चेहऱ्यावर दाखवले जाणरे नवरसातील काही मुद्राही ती करून दाखवते.

VIRAL VIDEO : सिंहाच्या पिंजऱ्यात तरुणाने मारली उडी! ठोका चुकवणारं CCTV फूटेज

EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज

Published by: Suraj Yadav
First published: October 18, 2019, 11:58 AM IST

ताज्या बातम्या