• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • ते सहा आणि तो एकटा; सिंहांच्या तावडीतूनही कसा सुटला छोटासा खेकडा पाहा VIDEO

ते सहा आणि तो एकटा; सिंहांच्या तावडीतूनही कसा सुटला छोटासा खेकडा पाहा VIDEO

सिंहानाही मात देणाऱ्या छोट्याशा खेकड्याच्या हिमतीला दाद द्यायला हवी.

 • Share this:
  मुंबई, 30 जून : एकटा सिंहसुद्धा (Lion) भल्या भल्या प्राण्यांवर भारी पडतो. त्यात जर सिंहांचा कळप असेल तर मग त्यांच्या तावडीतून सुटणं तर अशक्यच. पण हिंमत, बुद्धी आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास असेल तर काहीही अशक्य हे एका छोट्याशा खेकड्याने (Crab) दाखवून दिलं आहे. सिंहाच्या कळपाने त्याला घेरलं पण त्यांच्या तावडीतून छोटाशा खेकडा (Crab and lion video) सुटला आहे. सोशल मीडियावर सिंह आणि खेकड्याचा हा व्हिडीओ व्हायरल (Social media viral video) होतो आहे. एकेएक करत किती तरी सिंह खेकड्याभोवती जमा झाले पण त्यांनाही ठेंगा दाखवत खेकड्याने आपली सुटका करून घेतली. त्यांच्या तावडीतून तो नेमका कसा बचावला ते तुम्हीच या व्हिडीओत पाहा. व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक छोटासा खेकडा चालतो आहे. त्याच्यासमोरच एक सिंह बसला आहे. सिंह एकटक त्याच्याकडे पाहतो आहे. जसजसा खेकडा सिंहापासून दूर जातो तसंतसं सिंहही त्याचा पाठलाग करतो. सिंहाला आपल्या जवळ येताना पाहून खेकडा त्याला चेतावनी देतानाही दिसतो. मग सिंह गुपचूप पुन्हा खाली बसतो. हे वाचा - पती'राजा'चा थाट तर पाहा! आधी बायकोने त्याच्या पायातील चपलाही काढल्या आणि... त्यानंतर दुसऱ्या बाजूने आणखी एक सिंह त्या खेकड्याजवळ येतो. तोसुद्धा खेकड्याच्या मागेमागे पळतो. तसा खेकडासुद्धा आपल्या पळण्याचा वेग वाढवतो. पुढे तिसरा सिंहही उभा असतो. त्यानंतर हे दोन्ही सिंह त्या खेकड्याजवळ जाऊन बसतात आणि मग तिथं आणखी तीन सिंह पळत येतात आणि तेसुद्धा त्या खेकड्याला घेरतात. व्हिडीओच्या शेवटपर्यंत खेकडा काही सिंहाच्या हाती लागलेला दिसत नाही. हे वाचा - कोरोना लस घेत नव्हती म्हणून दोन्ही हातपाय धरले आणि...; पुढे काय घडलं पाहा VIDEO Latest Sightings युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार हे दृष्यं दक्षिण आफ्रिकेतल्या मलामला गेम रिझर्व्हमधील आहे. रुग्गेरू बॅरेटो आणि रोबिन स्वेल यांनी आपल्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ कैद केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. खेकड्याच्या हिमतीला दाद दिली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: