Home /News /viral /

चिमुकल्याची हिंमत तर पाहा! थेट जंगलाच्या राजासमोर गेला आणि...; पुढे काय घडलं Must watch video

चिमुकल्याची हिंमत तर पाहा! थेट जंगलाच्या राजासमोर गेला आणि...; पुढे काय घडलं Must watch video

चिमुकला सिंहासमोर जाताच... काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ व्हायरल.

  मुंबई, 21 जानेवारी : सिंह...जंगलाचा राजा... ज्याच्यासमोर जाण्याची हिंमत भल्याभल्या प्राण्यांचीही होत नाही मग माणसांचं तर सोडाच. पण तरी सिंहाला प्रत्यक्षात पाहण्याची उत्सुकता असतेच. त्यामुळे आपण जंगल सफारी, नॅशनल पार्कमध्ये जातो. त्यावेळी समोर सिंह दिसला तो अगदी दूर असला तरी आपल्याला घाम फुटतो. पण एक चिमुकला मात्र बिनधास्तपणे एका खतरनाक सिंहासमोर गेला आहे (child standing in front of lion). सिंहासमोर जाणाऱ्या एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (child lion video). हा चिमुकला हसत हसत सिंहाजवळ गेला. त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला  (child stand in front of lion) . त्यातही धक्कादायक म्हणजे त्याने सिंहाला चक्क स्पर्श केला child touching lion) . त्याच्या नाकाला हात लावला आणि त्याला किस करण्याचाही प्रयत्न केला. फक्त वाचूनच तुमच्या अंगावर काटा आला असेल नाही का? मग विचार करा त्या चिमुकल्याचं काय झालं असेल lion shocking video) . हे वाचा - एका शिकारीसाठी 3 चित्त्यांशी भिडलं एकटं माकड; VIDEO चा शेवट पाहून हैराण व्हाल हा मुलगा इतका लहान आहे की सिंह हिंस्र प्राणी आहे याची कल्पनाही नाही. या व्हिडीओत पुढे जे घडलं ते शॉकिंग होतं. व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही.
  व्हिडीओत पाहू शकता एक सिंह बसला आहे, चिमुकला त्याच्यासमोर उभा आहे. सिंह शांतपणे बसून त्या चिमुकल्याकडे पाहतो. सिंह तसा काहीच हालचाल करत नाही म्हणून चिमुकलाही बिनधास्त आहे. तो त्याला हात लावतो, किस करतो. सिंहही त्याच्याकडे शांतपणे तसा बसून टकामका पाहत राहतो. जणू काही तो त्याच्या बाललीलाच पाहत आहे. हे वाचा - खाली फिरतोय महाकाय मासा आणि वर पर्यटकाचं बोटींग; VIDEO पाहून भीतीच वाटेल! तसा हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयातील आहे. जिथं सिंह आणि या चिमुकल्याच्या मध्ये एक काचेची भिंत आहे. ज्यामुळे सिंहाला इच्छा असूनही तो कुणावरच हल्ला करू शकत नाही. कदाचित त्यामुळेच सिंह जसा आहे तसाच शांत बसून राहिला असावा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या