मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात...

VIDEO - समोर फणा काढून आला कोब्रा; बाळाने खेळणं म्हणून हातात धरला आणि अवघ्या 30 सेकंदात...

कोब्रा साप चिमुकल्यासमोर आला आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

कोब्रा साप चिमुकल्यासमोर आला आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

कोब्रा साप चिमुकल्यासमोर आला आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 25 जुलै : साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. पण काही लोक असे आहेत, ज्यांना सापाची बिलकुल भीती वाटत नाही, यात लहान मुलंही आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका बाळाने सापाला धरलं आहे. विषारी आणि खतरनाक समजला जाणारा कोब्रा साप बाळासमोर आला, फणा काढून उभा राहिला आणि बाळाने त्याचा फणा आपल्या हातात धरला. पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या अंगाचं पाणी पाणी होईल. लहान मुलांना समोर दिसेल ती वस्तू हातात घेण्याची सवय असते. विचार करा, त्यांच्यासमोर एखादा कोब्रा साप आला तर... आता हा साप आहे, तो धोकादायक आहे हे त्यांना माहिती नसतं. त्यांच्याासाठी ते खेळणंच. अशाच एका चिमुकल्यासमोर कोब्रा साप आला आणि फणा काढून उभा राहिला. सापाचा फणा पाहताच चिमुकल्याने हात पुढे केला आणि फणा आपल्या हातात धरला. हे वाचा - समोर सिंह, मागे बिबट्या, मध्येच अडकलेल्या तरुणाला चक्क वाघाने वाचवलं; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO व्हिडीओत पाहू शकता हा मुलगा इतका लहान आहे की त्याला नीट बोलता आणि चालताही येत नसेल. त्याच्यासमोर लांबलचक खतरनाक कोब्रा फणा काढून आहे. सापाला पाहताच चिमुकला हात पुढे करत त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बऱ्याच वेळा तो त्या सापाला धरतो. साप त्या चिमुकल्याच्या अंगावर जातो. त्याच्या तोंडाजवळही जातो. पाहूनच आपल्याला धडकी भरते. अवघ्या 30 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओच्या शेवटपर्यंत तरी सापाने मुलाला काही दुखापत केल्याचं दिसत नाही आहे. पण सापही इतका खतरनाक दिसतो आहे की या चिमुकल्या जीवाला अशा जीवघेण्या प्राण्यासोबत मस्ती करताना पाहून आपल्या हृदयाची धडधड वाढते. हे वाचा - WOW! सरड्याप्रमाणे रंग बदलणारा पक्षी पाहिलाय का? VIDEO मध्ये पाहा निसर्गाचा अद्भुत चमत्कार हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @awituchuz ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून एका युझरने सापाचे दात तोडून त्याचं विष काढल्याचं म्हटलं आहेत. तर अनेकांनी त्याच्या पालकांनी असं करू दिल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
First published:

Tags: King cobra, Snake, Snake video, Viral, Viral videos

पुढील बातम्या