पाण्यात खेळणाऱ्या चिमुकल्याचा भल्यामोठा माशाने जबड्यात धरला हात आणि...; VIDEO पाहून तुमच्या काळजाही चुकेल ठोका

मुलाने पाण्यात हात टाकला आणि पाण्यातील माशाने डोकं वर काढून...

मुलाने पाण्यात हात टाकला आणि पाण्यातील माशाने डोकं वर काढून...

  • Share this:
    मुंबई, 15 जून: लहान मूल असो किंवा मोठी व्यक्ती. पाण्यात खेळायला प्रत्येकाला आवडतं. समोर समुद्र, नदी, तलाव, स्विमिंग पूल काहीही दिसो त्या पाण्यात मनसोक्त आनंद लुटण्याचा मोह कुणालाच आवरत नाही. पाण्यात हात टाकून त्याच्याशी खेळण्याचा आनंदही काही औरच असतो. असाच आनंद एक चिमुकला लुटत होता. तेव्हा भल्यामोठ्या माशाने त्याचा हात आपल्या जबड्यात (Dolphin Fish attacked on boy) धरला. सोशल मीडियावर चिमुकल्याचा हात आल्या जबड्यात धरणाऱ्या या माशाचा व्हिडीओ (Fish video) तुफान व्हायरल होतो आहे. हा मुलगा एका स्विमिंग पूलजवळ बसून खेळत होता आणि त्याने आपला हात या पाण्यात टाकला. त्यानंतर पुढे काय घडलं ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.
    व्हिडीओत पाहू शकता, हा मुलगा स्विमिंग पूलमध्ये हात टाकून आपल्या हाताने पाणी उडवतो आहे. इतक्यात तिथं एक मासा येतो आणि तो त्याचा हात जबड्यात धरतो. त्यावेळी अक्षरश: काळजाचा ठोकाच चुकतो. हा मासा म्हणजे दुसरा तिसरा कुणी नाही तर चक्क डॉल्फिन आहे. हे वाचा - लग्नासाठी नाचत होती लेक, आईची सटकली आणि...; काय घडलं पाहा VIDEO तसं डॉल्फिनला माणसांचा मित्र म्हटलं जातं. ते माणसांना हानी पोहोचवत नाही. त्यांच्यासोबत खेळतात. म्हणूनच लहान मुलंसुद्ध डॉल्फिनला घाबरत नाहीत. समुद्रात डॉल्फिन माशांना उड्या मारताना पाहून किती आनंद होतो तो कुणीच शब्दात सांगू शकत नाहीत. अशात स्विमिंग पूलमध्ये डॉल्फिन दिसला तर मग कोण त्याच्याशी खेळणार नाही. असाच हा मुलगाही डॉल्फिन असलेल्या स्विमिंग पूलच्या पाण्यात खेळत होता. तो स्विमिंग पूलजवळील रेलिंगमधून आपला हात डॉल्फिनच्या दिशेने पाण्यात टाकतो. त्याचा हात पाहून डॉल्फिन त्याच्या जवळ येतो आणि त्याचा हात आपल्या जबड्यात घेतो. हे वाचा - पैसों के लिए कुछ भी! तलावात दिसल्या 500 च्या नोटा, त्याचं झालं असं की... मुलगा भीतीने आपला हात पटकन मागे घेतो. पण डॉल्फिनने चावल्याने त्याचा हाताला जखम झाल्याचंही या व्हिडीओत दिसतं आहे. युक्रेनच्या ब्लॅक सी रिसॉर्टचा असल्याचं सांगितलं जातं आहे. व्हिडीओ पाहून तशा बऱ्याच संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर माणसांशी मैत्री असणारा कोणताही प्राणी किंवा पक्ष्याशी खेळताना थोडं सावध राहायलाच हवं हे लक्षात येतं.
    Published by:Priya Lad
    First published: