वही न मिळाल्याने कारच्या काचेवर अभ्यास करू लागला मुलगा; मन सुन्न करणारा PHOTO
वही न मिळाल्याने कारच्या काचेवर अभ्यास करू लागला मुलगा; मन सुन्न करणारा PHOTO
व्हायरल झालेल्या या फोटोत एक मुलगा गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. अनेक मुलांकडे शिक्षणासाठी पैसे नसतात. अनेक मुलांकडे त्यांच्या अभ्यासासाठी वही-पुस्तकं घेण्याइतकेही पैसे नसतात.
नवी दिल्ली 17 फेब्रुवारी : देशाच्या संविधानाचे निर्माते आणि पहिले कायदा मंत्री बाबासाहेब भीमराव आंबेडकर म्हणाले होते की, 'शिक्षण हे सिंहिणीचं दूध आहे, जो जितकं पिणार तो तितकी गर्जना करणार'. याचा अर्थ शिक्षणातून सर्व काही साध्य होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल (Viral Photo of Little Boy) होत आहे. या छायाचित्रात एक मूल गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे (Kid Studying on Car Window). हे चित्र तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाईल.
एखाद्या मुलाच्या घरात लाईट नसेल तर तो रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करतो हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. काही दिवसांपूर्वीच एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक मुलगा भाजी विकत अभ्यास करताना दिसला होता. तर आता व्हायरल झालेल्या या फोटोत एक मुलगा गाडीच्या काचेवर अभ्यास करताना दिसत आहे. अनेक मुलांकडे शिक्षणासाठी पैसे नसतात. अनेक मुलांकडे त्यांच्या अभ्यासासाठी वही-पुस्तकं घेण्याइतकेही पैसे नसतात.
काही लोकांना वेळ आणि परिस्थितीमुळे पुढील शिक्षण पूर्ण करता येत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहिल्यानंतर नेटकरी भावुक झाले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की मुलगा गाडीच्या काचेवर इंग्रजी वर्णमालेतील ABCD अक्षरे लिहित आहे. हा मुलगा काचेवर एवझ्या उत्कटतेने एबीसीडी लिहित आहे की, हे पाहून नेटकऱ्यांचंही मन हेलावत आहे.
हा फोटो सर्वात आधी आयपीएस अधिकारी आरिफ शेख यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी हृदयस्पर्शी कॅप्शनही लिहीलं आहे. छायाचित्रासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे, ते ठिकाण आणि वेळ पाहत नाहीत.' सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला भरपूर पसंती मिळाली आहे. आतापर्यंत 7 हजारांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.