Home /News /viral /

पहिल्यांदा बहिणीला मांडीवर घेताच चिमुकल्याच्या डोळ्यातून आले घळाघळा अश्रू, Emotional Video

पहिल्यांदा बहिणीला मांडीवर घेताच चिमुकल्याच्या डोळ्यातून आले घळाघळा अश्रू, Emotional Video

यात एका मुलाच्या मांडीवर त्याची छोटीशी बहीण दिसते. आपल्या बहिणीला मांडीवर घेताच हा चिमुकला अतिशय इमोशनल होतो (Emotional Video of Brother and Sister).

  नवी दिल्ली 18 मार्च : सोशल मीडियावर आजकाल सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यातील विनोदी किंवा अतिशय भावुक करणारे व्हिडिओ लोकांच्या जास्त पसंतीस उतरतात. इतकंच नाही तर आजकाल लहान मुलांचे व्हिडिओदेखील लोकांच्या विशेष पसंतीस पडत असल्याचं पाहायला मिळतं. लहान मुलांचे व्हिडिओ (Viral Video of Children's) अतिशय निरागस आणि प्रेमळ असतात. याच कारणामुळे अशा व्हिडिओंना लोकांची भरपूर पसंती मिळते.

  जिलेबी आणि सामोशाचा विचित्र कॉम्बो; VIRAL VIDEO पाहून चिडले नेटकरी

  सहसा आपण पाहिलं असेल की कोणाचाही मोठा भाऊ किंवा बहीण त्यांची अतिशय प्रेमाने काळजी घेतात. सध्या समोर आलेला व्हिडिओही असाच आहे. यात एका मुलाच्या मांडीवर त्याची छोटीशी बहीण दिसते. आपल्या बहिणीला मांडीवर घेताच हा चिमुकला अतिशय इमोशनल होतो (Emotional Video of Brother and Sister). यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी येतं.
  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एका लहान मुलगा आपल्या बहिणीला पहिल्यांदाच पाहातो. तो रुग्णालयात आपल्या आईजवळ असलेल्या नुकत्याच जन्मलेल्या बहिणीला पहिल्यांदाच भेटतो. तो आपल्या बहिणीला मांडीवर घेतो. मात्र बहिणीकडे पाहाताच तो भावुक होतो आणि त्याच्या डोळ्यांत पाणी येतं.

  गाईला विनाकारण मारली काठी, दुसऱ्याच क्षणी हवेत उडाले आजोबा; काय घडलं पाहा VIDEO

  सोशल मीडियावर समोर आलेला हा इमोशनल व्हिडिओ मन जिंकणारा आहे. या मुलाचा निरागसपणा पाहून सगळेच त्याचं कौतुक करत आहेत. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. तर अनेकांनी यावर कमेंट करत भाऊ-बहिणीच्या या खास प्रेमळ नात्याचं कौतुक केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Emotional, Small baby, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या