मुंबई 23 मार्च : मगरींना धोकादायक शिकारी मानलं जातं आणि त्या कधीही प्राणघातक हल्ला करून तुम्हाला जखमी करू शकतात. या कारणास्तव, लोक मगरींपासून नेहमी अंतर ठेवतात. या मगरींना त्यांच्या भक्ष्यावर हल्ला करायला वेळ लागत नाही. डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत त्या आपल्या भक्ष्याची शिकार करतात. यामुळेच सावध राहून लोक मगरींपासून नेहमी सुरक्षित अंतर राखण्याचा प्रयत्न करतात. मात्र, नुकतंच एक मुलगा मगरीचं पिल्लू पाठीवर घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जेव्हा कुत्र्यांसमोर जंगलाचा राजा बनला 'भीगी बिल्ली'; सिंहाने घाबरून ठोकली धूम, पाहा VIDEO
हा मुलगा बेधडकपणे मगरीला पाठीवर घेऊन रस्त्याच्या कडेला चालत आहे. व्हायरल क्लिप गेल्या महिन्यात 16 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आली होती. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, "मगरीचा स्वाभिमान लगेचच कोसळला असावा." फुटेजमध्ये एक मुलगा एका मगरीला घेऊन जाताना दिसतो, त्याने मगरीला आपल्या पाठीवर घेतलं आहे. लहान मुलाने मगरीचे पुढचे पाय आपल्या हातांनी पकडून खांद्याजवळ ओढलेले दिसतात, तर बाकीची मगरी मागे लटकलेली दिसते.
harga diri si buaya langsung turun pic.twitter.com/xl3z1tlpHR
— (@FunnyVideosID) February 16, 2023
मुलाचे हे बेधडक कृत्य पाहून घटनास्थळी उपस्थित लोक थक्क झाले. तर काहींनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. व्हिडीओमध्ये ठिकाणाचा उल्लेख नसला तरी, ज्या परिसरात हा व्हिडीओ काढण्यात आला आहे, त्या जागेवरून असं जाणवतं की हे मासेमारी करणारं गाव आहे. जवळून पाहिल्यावर इन्सुलेटेड फिश कंटेनर देखील रस्त्यावर रांगेत लावलेले दिसतात.
या व्हिडिओवर नेटिझन्सनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं की, "मगर थकली आहे. तिला मदतीची गरज आहे." दुसऱ्याने टोमणे मारत म्हटलं की, "मगरीला एक चांगला मित्र सापडला आहे." याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. आतापर्यंत 14 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Shocking video viral