Home /News /viral /

लाइव्ह मुलाखतीदरम्यानच मध्ये येत मुलानं विचारला विचित्र प्रश्न; लाजून महिलेनं मागितली माफी, Funny Video

लाइव्ह मुलाखतीदरम्यानच मध्ये येत मुलानं विचारला विचित्र प्रश्न; लाजून महिलेनं मागितली माफी, Funny Video

या व्हिडिओमध्ये लाईव्ह मुलाखतीदरम्यानच (Live Interview) आपला मुलगा मध्ये आल्यानं या महिलेला अनेकदा माफी मागावी लागली.

    नवी दिल्ली 07 सप्टेंबर : वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू झाल्यापासून जगभरातून अनेक असे व्हिडिओ समोर आले ज्यामुळे संबंधित व्यक्तीला मोठा अपमान सहन करावा लागला. असाच आणखी एक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये लाईव्ह मुलाखतीदरम्यानच (Live Interview) आपला मुलगा मध्ये आल्यानं या महिलेला अनेकदा माफी मागावी लागली. महिला स्काय न्यूज चॅनलवर लाईव्ह मुलाखत देत होती आणि अत्यंत महत्त्वाचं काहीतरी बोलत होती. मात्र, इतक्यात लहान मुलानं दरवाजा उघडला आणि टीव्ही पॅनेलमध्ये उपस्थित सर्वच थक्क झाले. तरुण-तरुणीचे बाईकवर अश्लील चाळे; सोशल मीडियावरील Viral Video वर टीकेचा भडिमार असंही नव्हतं की या मुलाला आपल्या आईकडे काही फार महत्त्वाचं काम होतं. हे जाणून तुम्हालाही हसू येईल की त्यानं केवळ एका बिस्कीटसाठी आपल्या आईचा इन्टरव्ह्यू खराब केला. मिळालेल्या माहितीनुसार , व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचं नाव हेयन्स आहे आणि ती मार्क ऑस्टिनवर चर्चा करत होती. इतक्यात रुमचा दरवाजा उघडून तिचा मुलगा आत येतो आणि वारंवार तिला बिस्कीट मागू लागतो. ती बराच वेळ त्याला तिथून जाण्यास सांगते मात्र तो ऐकत नाही. तो स्क्रीनच्या मागे उभा राहून बोलतो आणि नंतर स्क्रीनवर आपला हात आणतो. स्टंट मारताना चवताळला बैल, शिंगावर धरून हवेतच उडवलं; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO हे सगळं घडत असताना लाजून हेयन्सचा चेहरा लाल होतो. ती मुलाखतीत अनेकदा सॉरी बोलून माफी मागते. व्हिडिओमध्ये हेयन्स बोलताना दिसते, की डेविन कॅमरून बोलत होते की....मला माफ करा माझा मुलगा मध्ये आा, यासाठी माफी मागते. सॉरी. तर हा मुलगा आईला विचारत आहे, की आई मला दोन बिस्कीट मिळू शकतात का? हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसू आवरत नाहीये. 22 सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट करत म्हटलं, की या मुलाला चांगलंच माहिती होतं, की तो काय करत आहे आणि त्यानं मुद्दाम बिस्कीट मागितले. एका यूजरनं यावर कमेंट करत म्हटलं की माझ्यासोबत हे रोज घडतं. माझा 3 वर्षाचा मुलगा रोज असंच काहीतरी करतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Viral video on social media

    पुढील बातम्या