Home /News /viral /

Yummy! 3 वर्षांच्या चिमुकल्याने इवल्याशा हातांनी बनवली इतकी भारी Dish; Recipe Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

Yummy! 3 वर्षांच्या चिमुकल्याने इवल्याशा हातांनी बनवली इतकी भारी Dish; Recipe Video पाहूनच तोंडाला सुटेल पाणी

3 वर्षांच्या मुलाचं कुकिंग स्किल पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

  मुंबई, 02 मे : स्वयंपाक करणं, एखादा पदार्थ बनवणं म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर, मेहनतीनंतर जेवण बनवायला येतं. बऱ्याच मोठ्या माणसांनाही स्वयंपाक करणं जमत नाही. असं असताना अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याने मात्र सर्वांना थक्क केलं आहे (3 year old boy cooking video). ज्या वयात स्वतःच्या हातांनी नीट खाताही येत नाही. त्या वयात या मुलाने चक्क एक जबरदस्त डिश तयार केली आहे (Little chef video). हा व्हिडीओ पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल (Baby chef made food). लहान मुलांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुणी आपल्या खट्याळपणाने सर्वांचं लक्ष वेधतं. कुणी गाणं गाऊन तर कुणी डान्स करून. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक मुलगा यापैकी काहीच करत नाही. पण तो जे काही करून दाखवतो ते कित्येक मोठ्या माणसांनाही शक्य नाही. त्याने चक्क आपलं कुकिंग स्किल दाखवलं आहे. त्याचं हे स्किल पाहून सर्वजण भारावले आहेत. जे वय खेळण्याचं, बागडण्याचं, आवडीचे चमचमीत पदार्थ हट्टाने मागून खाण्याचं आहे, त्या वयात या मुलाने आपल्या इवल्याशा हाताने जबरदस्त पदार्थ स्वतःच तयार केला आणि त्याची चव चाखली आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Oliver (@chezoliz)

  @chezoliz  नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मला पसग्ना आवडतं, मला पसग्ना आवडं. आम्ही आमच्या पसग्नामध्ये चार प्रकारच्या वस्तूंचा वापर केला आहे. ओह माय गॉड. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. खरंतर या पदार्थाचं नाव लसग्ने आहे. मुलाला हा शब्द नीट उच्चारता येत नाही आहे. पण त्याने तो अगदी परफेक्ट बनवला आहे. ओलिव्हर असं या मुलाचं नाव आहे. व्हिडीओत पाहू  शखता लसग्ने बनवण्याची सर्व प्रक्रिया तो स्वतःच करतो. शेवटी तो डिश सुंदररित्या सजवून सर्व्हही करतो. हा बेबी शेफ म्हणा किंवा लिटल शेफ त्याला पाहून सर्वांनी त्याचं कौतुक केलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Food, Recipie, Small child, Viral, Viral videos

  पुढील बातम्या