• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे बापरे! सिंहांच्या कळपाने कारला घेरलं आणि...; पाहा धडकी भरवणारा VIDEO

अरे बापरे! सिंहांच्या कळपाने कारला घेरलं आणि...; पाहा धडकी भरवणारा VIDEO

सिंहांनी गाडीला सर्वबाजूंनी घेरलं.

 • Share this:
  मुंबई, 19 ऑक्टोबर : सिंह (Lion) म्हटलं तरी आपल्याला धडकी भरते. तसं आपण सिंह पाहायला जंगल, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहायलात जातो आणि तो दिसताच आपल्याला घाम फुटतो (Lion video). विचार करा हा सिंह जर अचानक तुमच्यासमोर आला तर काय होईल? जीव गेल्यातच जमा नाही का. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात सिंहाचा कळप रस्त्यावर आला आणि चक्क एका गाडीला घेरलं आहे. एक-दोन नव्हे तर तीन-तीन सिंहांनी कारला घेरलं आहे. एक सिंह गाडीच्या छतावर आणि दोन सिंह गाडीच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. कोणी आपल्या तावडीत सापडतं आहे का? याचीच प्रतीक्षा हे सिंह करत होते. सुरुवातीला एक सिंह गाडीच्या छतावर उभा होता. त्यानंतर आणखी दोन सिंह येतात आणि दोघंही गाडीच्या दोन्ही बाजूला उभे राहतात. गाडीला सर्वबाजूनी सिंह घेरतात. गाडीच्या आत घुसण्याचाही ते प्रयत्न करताना दिसतात. गाडीच्या छतावर असलेला सिंह गाडीचा दरवाजा उघडायला बघतो. तसंच गाडीच्या समोरील काचेतूनही आत डोकावून पाहत होते. व्हिडीओ पाहूनच धडकी भरते .गाडीतील प्रवाशांना बाहेर पडायला मार्गच नाही आहे. सुदैवाने गाडी लॉक केली असल्याचं दिसतं आहे त्यामुळे सिंह आत जाऊ शकत नाहीत. हे वाचा - अरे बापरे! माकडाने मालकाच्या डोक्यावर केले तलवारीने वार; VIDEO VIRAL आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. चावी आत असताना अचानक दरवाजा बंद झाल्यानंतर असं मजेशीर कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: