केन्या, 28 नोव्हेंबर : जंगलाचा राजा सिंह (Lion video) आणि पाण्यात राज असलेली मगर (Crocodile video) यांचे शिकार करतानाचे खतरनाक व्हिडीओ (Animal video) तुम्ही बरेच पाहिले असतील. पण या दोघांचीही शिकार (Animal fighting video) एकच असेल तेव्हा नेमकं काय घडू शकतं, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. फक्त एका शिकारासाठी सिंह आणि मगरामध्ये जबरगस्त फायटिंग झाली आहे (Lions and crocodile fighting video).
सिंह, मगर दोघंही न घाबरणारे, हार न मानणारे आणि मागे न हटणारे प्राणी. आपली शिकार ते कशीही करून मिळवतात. अशाच या दोन प्राण्यांमध्ये एका शिकारासाठी लढाई झाल्यावर कोण बाजी मारेल, याची उत्सुकता वाढवणारा असाच हा व्हिडीओ आहे. कारण दोन्ही प्राणी दोघंही एकमेकांना सॉलिड टक्कर देतात. विशेष म्हणजे या लढाईत मगर एकटीच आहे, तर तिच्यासमोर तीन तीन सिंह आहेत. पण तरी या मगरीने तिन्ही सिंहाशी चांगलीच झुंज दिली आहे.
केन्यातील सांबुरी नॅशनल रिझव्हरमधील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ 2014 सालातील आहे पण तो पुन्हा व्हायरल होतो आहे.
हे वाचा - OMG! एका किकमध्ये जिराफाने भल्यामोठ्या गेंड्याला उडवलं; पाहा VIDEO
व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक मगर आणि एक सिंह समोरासमोर आहेत. दोघंही एकमेकांवर हल्ला करताना दिसतात. जशी मगर हल्ला करायला येते तसा सिंह मागे हटतो आणि मग मगरीच्या मागून आणखी दोन सिंह येतात. त्यानंतर तिन्ही सिंह मगरीवर अक्षरशः तुटून पडतात. तिला धरण्याचा प्रयत्न करतात. पण मगर त्या तिघांच्याही तावडीतून सुटून बाजूला होते. ती कोणत्याच सिंहाच्या हाती लागत नाही. त्यानंतर एक सिंह पुन्हा तिच्याजवळ येतो. त्यानंतर मगर आणि सिंह दोघं एकमेकांसमोर उभे राहून एकमेकांकडे फक्त पाहताना दिसतात.
हे वाचा - VIDEO: चिमुकल्याने हातात आणली गवताची काडी; पाहून जिराफाने जे केलं ते मन जिंकणारं
Kai Banks नावाच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना दिलेल्या माहितीनुसार काही तांत्रिक कारणामुळे शेवटपर्यंत हा व्हिडीओ शूट करण्यात आला नाही. त्यामुळे व्हिडीओच्या शेवटी फोटो दाखवण्यात आले आहेत. शेवटच्या फोटोत चार सिंह मृत हत्तीजवळ दिसत आहेत द सनच्या रिपोर्टनुसार, एका मृत हत्तीसाठी सिंह आणि मगर आपसात भिडले. इथं मगर कुठेच दिसत नाही आहे याचा अर्थ ही लढाई जिंकली ती सिंहाने. कारण ते तिघं होते आणि मगर एकटी होती. मगर तिन्ही सिंहाशी लढा देतो पण एकटा या तीन सिंहाशी किती लढणार. त्यामुळे मगरीचा त्यांच्यासमोर टिकाव लागणं शक्य नव्हतंच. पण तरी मगरीने त्यांना चांगलीच झुंज दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Viral, Viral videos, Wild animal