Home /News /viral /

याला म्हणतात नशीब! अगदी जवळ असूनही सिंहाच्या तावडीत मांजर काही सापडलं नाही कारण...

याला म्हणतात नशीब! अगदी जवळ असूनही सिंहाच्या तावडीत मांजर काही सापडलं नाही कारण...

बिचारा सिंह! आल्या पावली तसाच माघारी रिकाम्या हाती, उपाशी पोटी परतला.

    मुंबई, 25 जून: मांजराला (Cat) वाघाची मावशी म्हटलं जातं. हीच वाघाची मावशी आणि सिंह (Lion) जर समोरासमोर आले तर काय होईल... साहजिकच सिंहासमोर वाघाच्या मावशीचं (Cat and lion) काही खरं नाही... पण सोशल मीडियावर अशाच सिंहाचा आणि मांजराचा व्हिडीओ (Cat and lion video) व्हायरल (Social media viral video) होतो आहे. ज्यात अगदी जवळ असूनही सिंह मांजराचं काहीच बिघडवू शकला नाही. सिंह आणि मांजर यांच्या अवघ्या काही फुटांचंच अंतर. पण तरी मांजराला पकडू शकला नाही किंवा मांजर त्याच्या तावडीत सापडलंच नाही. असं नेमकं घडलं तरी काय की भलामोठा सिंह जो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतो तो एवढ्याशा मांजराची शिकार करू शकला नाही. व्हिडीओत पाहू शकता. मांजर आणि सिंह भले एकमेकांच्या अगदी जवळ आहेत. पण त्यांच्यामध्ये एक काच आहे. म्हणजे हे मांजर पाळलेलं आहे. जे आपल्या मालकाच्या घरात आहेत. हे वाचा - VIRAL: आलं अंगावर घेतलं शिंगावर! म्हशीच्या वाकड्या शिंगात असा अडकला कुत्रा की.. घराच्या बाहेर सिंह आहे. काचेचा दरवाजा बंद आहे. सिंह त्यावर आपला पंजा फिरवून मांजरीला पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे. तो काचेचा दरवाजा उघडण्याचाही प्रयत्न करताना दिसतो. मांजरीला पाहून जोरजोरात डरकाळ्याही फोडतो. तर दुसरीकडे मांजर मात्र घरात निवांत बसून सिंहाची जणू मजाच पाहते आहे. काहीच हालचाल न करता, सिंहाला घाबरून तिथून अजिबात न हलता ती शांत बसून राहिली आहे. जसं काय ती बघ मी तुझ्यासमोर आहे, तू माझं काहीच करू शकत नाही या अॅट्यिट्युडमध्येच सिंहासमोर बिनधास्तपणे छाती ताणून आहे. हे वाचा - ना कार्ड, ना पिन, फक्त दरवाजा उघडा; ATM सारखे धडाधड पैसे देते ही कार; पाहा VIDEO अखेर काय, सिंह काही दरवाजा उघडण्यात यशस्वी होत नाही. अगदी शिकार समोर असूनही त्याला शिकार काही करता येत नाही. मग काय बिचारा सिंह आल्या पावली तसाच माघारी परततो. रिकाम्या हाती, उपाशी पोटीच त्याला परतावं लागलं. Mack & Becky Comedy ट्विटवर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं, हे आम्हाला आमच्या सोशल मीडियावर कमेंटमध्ये जरूर सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cat, Pet animal, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या