मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Viral Video : शिकारीला गेलेला सिंह अडकला मगरीच्या तावडीत... पुढे जे घडलं ते अशक्यच

Viral Video : शिकारीला गेलेला सिंह अडकला मगरीच्या तावडीत... पुढे जे घडलं ते अशक्यच

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून नेहमीच क्रुर आणि भितीदायक वाटणाऱ्या या सिंहाची तुम्हाला दया येऊ लागले आणि तो बिचारा असल्याचं वाटू लागेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई २४ नोव्हेंबर : सोशल मीडियावर व्हिडीओ पाहाणं हे हल्ली लोकांसाठी एक विरंगुळा झाला आहे. लोक थोडं जरी बोर झालं तरी देखील सोशल मीडियाकडे वळतात. येथे लोकांना असंख्य असे आपल्या आवडीचे व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये सायन्स, आर्ट्स, कॉमेडी तसेच वाईल्ड लाईफ संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.

जगात प्राणी प्रेमींची कमी नाही. त्यामुळे अनेक लोक प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. या व्हिडीओंना आवडीने पाहाणारा देखील एक वर्ग आहे.

हे ही पाहा : ''आ बैल मुझे मार'' तरुणाचा मुर्खपणा पाहून तुम्ही देखील हेच म्हणाल... Video Viral

वाईल्ड लाईफ संबंधीत काही व्हिडीओ हे आपल्यासमोर येतात जे कधी खूपच सुंदर असतात. तर काही व्हिडीओ हे हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. तसेच कधी-कधी प्राण्यांशी संबंधीत हे व्हिडीओ लोकांना खूप काही शिकवून जातात.

सध्या एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. जो सिंहाचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये शिकारी असलेला सिंहच मगरींचा शिकार होणार असल्याचे दिसत आहे.

आयुष्या हे गोल असतं. त्यामुळे कोणाच्या आयुष्यात कधी कोणती वेळ येईल हे सांगू शकत नाही. तसंच काहीसं या सिंहासोबत घडलं असल्याचं तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल.

काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून नेहमीच क्रुर आणि भितीदायक वाटणाऱ्या या सिंहाची तुम्हाला दया येऊ लागले आणि तो बिचारा असल्याचं वाटू लागेल.

खरंतर आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी सिंह शिकार शोधत होता. तेव्हा त्याला पाण्यात एक मोठा प्राणी दिसला. यासाठी सिंह त्याच्या जवळ गेला. पण जवळ पोहोचताच त्याच्या लक्षात आलं की हा प्राणी खूप वेळापूर्वी मेला आहे. त्यामुळे त्याला आता तो काही खाऊ शकणार नाही.

त्यामुळे सिंहाच्या हातातून संधी गेली होती, पण काही क्षणात त्याला हे लक्षात आलं की आता तो कोणाचा तरी भक्ष्य होणार आहे.

कारण या सिंहाला मगरीच्या कळपाने चारही बाजून वेढलं होतं आणि त्या आता सिंहाला भक्ष्य बनवण्याच्या तयारीत होत्या.

या प्रकरणानंतर सिंह आपले प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागला.

अशा स्थितीत तुम्हाला काय वाटतं? पाण्यामध्ये अडकलेला सिंह इतक्या मगरींच्या तावडीतून सुटू शकेल का? हे पाहून कोणीही सहज उत्तर देईल 'अशक्य'. तुम्हीही असाच विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. किंबहुना इतक्या मगरींसमोर सिंहाने हार न मानता पाण्यावर उडी मारुन तेथून पळ काढण्याचा रस्ता काढलाच.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे डझनभर मगरी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत राहिल्या, पण जंगलाच्या राजाला कोणीही काहीच करु शकले नाही आणि सिंह सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर आला.

मगरी आणि सिंहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. प्राणी_पॉवर्सच्या पेजवरून इन्स्टाग्रामवरही तो अपलोड करण्यात आले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे आणि हजारो लोकांनी तो लाईक देखील केला आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Top trending, Videos viral, Viral, Wild life