Home /News /viral /

बछड्यांचा घास पळवणाऱ्या सिंहाचा प्रायव्हेट पार्टच...; चवताळलेल्या सिंहिणींनी दिली भयंकर शिक्षा

बछड्यांचा घास पळवणाऱ्या सिंहाचा प्रायव्हेट पार्टच...; चवताळलेल्या सिंहिणींनी दिली भयंकर शिक्षा

शिकार पळवणाऱ्या सिंहावर सिंहिणींनी असा हल्ला केला आहे, की यापुढे सिंह पुन्हा तशी हिंमत कधीच करणार नाही.

    मुंबई, 25 जानेवारी : सिंह जंगलाचा राजा... ज्याच्यासमोर भलेभले प्राणी फेल होतात. पण तो कितीही ताकदवान असला तरी एका आईसमोर त्याचं काहीच चालू शकत नाही, याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बछड्यांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या सिंहाला सिंहिणींनी भयंकर शिक्षा दिली आहे (Lionesses Fight with Lion). यापुढे तो त्यांच्यासमोर जाण्याचीही हिंमत करणार नाही (Lion loses testicle in fight with lionesses). सिंहिणींशी पंगा घेणं सिंहाला चांगलंच महागात पडलं आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत. केन्याच्या मसाई मारा नॅशनल पार्कमधील (Maasai Mara National Park) ही घटना आहे. सिंहिणींनी एका म्हशीची शिकार केली होती. त्यांनी आपल्या 11 बछड्यांना खायला दिलं. त्याचवेळी मँडेवो सिंह तिथं आला. तो बछड्यांची शिकार पळवत होता, ते पाहून सिंहिणींनी चवताळल्या. एकत्र मिळून त्या सिंहावर तुटून पडला. बिच्चारा सिंह एकटा पडला. सिहिणींनचा मुकाबला तो करू शकला नाही. हे वाचा - मेंढीशी पंगा घेणं व्यक्तीला पडलं भारी; अखेर ओढावली अशी वेळ की...; Watch Video रागात सिहिंणींनी त्याचा प्रायव्हेट पार्ट चावला. सिंहाची अवस्था इतकी भयंकर झाली होती की त्याला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याचं एक टेस्टिकल काढून टाकलं आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार फोटोग्राफर ग्रेन सॉवरबी  यांनी ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. सिंहिणींनी सिंहावर हल्ला करताच त्यांनी रेंजर्सला याबाबत माहिती दिली त्यानंतर सिंहाला तात्काळ उपचार देण्यात आले. आता तो हळूहळू बरा होतो आहे. हे वाचा - संतप्त हत्ती JCB चा चुराडा करायला गेला पण...; विचारही केला नसेल असा VIDEOचा शेवट सिंहावर सिंहिणींनी इतका भयंकर हल्ला करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा अशी बरीच प्रकरणं समोर आली आहेत. याआधीही सिंहांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात सहा-सहा सिंहिणींनी एका सिंहाला घेरलं होतं. त्याला घट्ट धरून ठेवलं होतं. त्याच्या शरीरावरील केसही ओढून काढले होते. बिच्चारा सिंह वेदनेने ओरडत होता. पण सिंहिणींच्या तावडीतून सुटणं त्याला शक्यच नव्हतं. तो तसाच पडून राहिला होता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral

    पुढील बातम्या