Home /News /viral /

इवल्याशा कासवाला पाहून सिंहाने ठोकली धूम; असं नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

इवल्याशा कासवाला पाहून सिंहाने ठोकली धूम; असं नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल (Funny Video of Lion and Turtle) झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात जंगलाचा राजा चक्क एका कासवाला घाबरताना दिसत आहे.

  नवी दिल्ली 13 एप्रिल : सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. त्याची एक गर्जना जंगलातील सर्वात मोठ्या भक्षक प्राण्याचा घाम काढण्यासाठीही पुरेशी आहे. अनेकदा सिंहाला पाहून इतर वन्य प्राणी आपला मार्ग बदलताना दिसतात. जेव्हा एक सिंह शिकार करण्यासाठी बाहेर पडतो, तेव्हा कोणताही प्राणी त्याच्यासमोर उभं राहण्याचं धाडसही करू शकत नाही. सिंहाची हीच प्रतिमा आपल्या मनात सुरुवातीपासून आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल (Funny Video of Lion and Turtle) झाल्याचं पाहायला मिळत आहे. यात जंगलाचा राजा चक्क एका कासवाला घाबरताना दिसत आहे. खाद्य देण्यासाठी गेलेल्या तरुणीचा हात जबड्यात पकडून मगरीने पाण्यात खेचलं, अंगावर काटा आणणारा VIDEO कासव आणि ससा यांची कथा आपण सर्वांनी ऐकली असेलच. वेगात धावण्याची क्षमता नसली तरी न थांबता धिम्या गतीने चालत कासव शेवटी त्याता प्रतिस्पर्धी असलेल्या सशाचा पराभव करतो. आता सशाला पराभूत केल्यानंतर कासवाचा आत्मविश्वास आणखीनच वाढलेला दिसतोय. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कासव थेट जंगलाचा राजा सिंहासोबतच पंगा घेताना दिसत आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
  व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये दिसतं की तलावाच्या काठावर सिंह पाणी पित आहे. त्याचं लक्ष पूर्णपणे पाण्यावर आहे. इतक्यात पाण्याखाली तरंगणारं कासव सिंहाच्या समोर येतं आणि सिंहाला तिथून हटवण्यासाठी आपल्या तोंडाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतं. झुरळ कानात गेल्याने बहिरा झाला व्यक्ती; थेट कोर्टात घेतली धाव, वाचा अजब प्रकरण यानंतर सिंहदेखील काही अंतरावर जाऊन दुसऱ्या ठिकाणी पाणी पिऊ लागतो. मात्र, कासव एवढ्यावरच थांबत नाही. तर ते पुन्हा सिंहाच्या दिशेनं जातं आणि पुन्हा सिंहाला तिथून बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागतं. यावेळीही सिंह काहीही प्रतिक्रिया न देता पुन्हा तिथून बाजूला होतो आणि पाणी पिण्यासाठी दुसरीकडे जातो. कासव आणि सिंहाचा असा व्हिडिओ कदाचित तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही अवाक झाले.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या