Home /News /viral /

बापरे बाप! वृद्ध व्यक्तीला सिंहाने जबड्यात धरून फरफटत नेलं; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य

बापरे बाप! वृद्ध व्यक्तीला सिंहाने जबड्यात धरून फरफटत नेलं; कॅमेऱ्यात कैद झालं भयावह दृश्य

सिंहांच्या क्षेत्रात एक वृद्ध व्यक्ती घुसली. या व्यक्तीवर सिंहाने खतरनाक हल्ला केला.

    मुंबई, 26 मे :  पिंजऱ्यातील एका सिंहाशी पंगा घेणाऱ्या तरुणाची सिंहाने काय अवस्था केली, याचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता (Lion attack video). तुम्हीसुद्धा कदाचित हा व्हिडीओ पाहिला असावा. मग विचार करा जो सिंह कैद नाही, त्याच्यासमोर गेल्यावर काय होईल. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो पाहूनच अंगावर अक्षरश: काटा येईल. एका वृद्ध व्यक्तीला एका सिंहाने आपल्या जबड्यात धरून फरफटत नेलं आहे (Lion attack on man). सिंहांच्या क्षेत्रात एक वृद्ध व्यक्ती घुसली. या व्यक्तीवर सिंहाने खतरनाक हल्ला केला. सिंहाने माणसावर केलेल्या हल्ल्याचं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. धडकी भरवणार असं हे दृश्य आहे (Animal attack video viral). व्हिडीओत सुरुवातीला एक वृद्ध व्यक्ती धावताना दिसते. त्यानंतर तिच्या मागे मागे सिंह येताना दिसतो. तेव्हाच आपल्या हृदयाची धडधड वाढते. ही व्यक्ती सिंहापासून आपला जीव वाचवण्यासाठी पळत असते. रिपोर्टनुसार ती व्यक्ती गेटजवळ येऊन पोहोचतेच. ती बाहेर पडणार तोच सिंह तिच्यावर अटॅक करतो. आपल्या जबड्यात धरून फरफटत घेऊन जातो. सिंहापासून वाचण्याचे या व्यक्तीची सर्व धडपड वाया जाते. इतकं पळून, प्रयत्न करूनही ती सिंहाच्या तावडीत सापडते. हे वाचा - Shocking Video - मिठी मारत थेट मगरीलाच किस करायला गेला तरुण; धक्कादायक शेवट हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे माहिती नाही. पण animalabis नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. खायला देणाऱ्या तरुणावरच तुटून पडला सिंह याआधी दक्षिण आफ्रिकेच्या मकरेले प्रिडेटर सेंटरमध्येही अशीच एक घटना घडली होती.  प्राणीसंग्रहालयात दररोज खाणं देणाऱ्या व्यक्तीवरच सिंहाने भयंकर हल्ला केला. माइक होडगेवर असं या तरुणाचं नाव. माइक आणि त्यांचं कुटुंब दक्षिण आफ्रिकेतील थाबाजीबीमध्ये लायन रिझर्व्हची देखभाल करतात. माइक तिथं सिंहांना आपल्या मुलांप्रमाणे पाळतो. पण ज्यांना आपण पाळत आहोत, त्यापैकीच एखादा सिंह आपल्यावर हल्ला करेल याचा त्याने विचारही केला नव्हता. नेहमीप्रमाणे तो सिंहाला पिंजऱ्यात खायला द्यायला गेला होता. पण सिंहाने त्यालाच आपल्या जबड्यात धरलं आणि दूरपर्यंत फरफटत नेलं.  सिंहाने माइकवर केलेला हल्ला पाहून इतर कर्मचाऱ्यांना घाम फुटला. पण त्याला सिंहाच्या तावडीतून सोडवण्याची हिंमत करणार कोण? सर्वजण मोठमोठ्याने ओरडू लागले. हे वाचा - अंडी चोरण्यासाठी आलेल्या तरुणीला मोराने आधी धक्का देऊन खाली पाडलं; मग केला हल्ला, Shocking Video अखेर काय कुणास ठाऊक सिंहाला काय वाटलं त्याने माइकला आपल्या जबड्यातून सोडलं आणि तिथून निघून गेला. माइकचं नशीब चांगलं म्हणून तो सिंहाच्या तावडीतून सुटला. पण तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या शरीराची हालचालही होत नव्हती. त्याच्या शरीरावर सिंहाच्या दातांच्या जखमा होत्या. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या