Home /News /viral /

सिंहानं घेतला थेट हत्तीशी पंगा! अंगावर मारली झडप अन्..; पाहा शिकारीचा LIVE VIDEO

सिंहानं घेतला थेट हत्तीशी पंगा! अंगावर मारली झडप अन्..; पाहा शिकारीचा LIVE VIDEO

एक सिंह छोट्याशा हत्तीची शिकार (Lion Attacked Elephant) करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करतो. हत्तीदेखील स्वतःला वाचवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करतो.

  नवी दिल्ली 26 जून : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा जंगली प्राण्याचे व्हिडिओ (Wild Animals Videos) व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलेच पसंतीसही पडतात. अनेकदा हे व्हिडिओ अगदी मजेशीर असतात, तर काही वेळा असे व्हिडिओ पाहून आपणही हैराण होतो. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral on Social Media) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल, की सिंहाला जंगलाचा राजा का म्हटलं जातं. आपल्या सर्वांना माहिती आहे, की शिकार करणं ही सिंहाची सवय किंवा त्याच्या उपजीविकेसाठी हे करणं त्याला भागच असते. सिंह आपल्या हिमतीनं जंगलातील मोठमोठ्या प्राण्यांचीही शिकार अगदी सहजपणे करतो. याच कारणामुळे, जंगलातील सर्व प्राणी सिंहापासून दूर राहाण्यातच आपलं भलं मानतात. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. VIDEO : लग्नाच्या स्टेजवरच नातेवाईकाचं विचित्र कृत्य; नवरीनं लगावली कानशिलात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक सिंह छोट्याशा हत्तीची शिकार (Lion Attacked Elephant) करण्यासाठी त्याच्यावर हल्ला करतो. हत्तीदेखील स्वतःला वाचवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करतो. मात्र, तो सिंहाच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यात अपयशी ठरतो. सिंह त्याच्यावर हल्ला करुन हत्तीला जमिनीवर पाडतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे आणि लोकांच्या पसंतीसही पडत आहे.
  कुठे आहे महिला सुरक्षा? भररस्त्यात महिलेला चपलेने मारहाण; VIDEO करीत राहिले बघे अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. एका यूजरनं म्हटलं, की सिंहाची शिकारीची ही स्टाईल अत्यंत वेगळी होती. तर, दुसऱ्या एका यूजरनं म्हटलं, की या सिंहाला थोडीही दया येत नाहीये. याशिवायही अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर wildlife_0.2 या पेजवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओ हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Videos viral, Wild animal

  पुढील बातम्या