Home /News /viral /

सिंहासोबत करत होता मस्ती; भडकलेल्या जंगलाच्या राजाने हात जबड्यात पकडला अन्.., Shocking Video

सिंहासोबत करत होता मस्ती; भडकलेल्या जंगलाच्या राजाने हात जबड्यात पकडला अन्.., Shocking Video

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने थेट सिंहासोबत मस्ती करायला सुरुवात केली आणि काहीच वेळात त्याला त्याची किंमत चुकवावी लागली (Lion Ripped Off Man’s Finger ).

    नवी दिल्ली 23 मे : सिंह दुरून दिसला तरी आपली वाट बदलून तिथून निघून जाणंच योग्य असतं, असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर हा प्राणी पिंजऱ्याच्या आत असला तरीही त्याच्यापासून सावध राहाणं अतिशय गरजेचं आहे. मात्र ज्यांना ही गोष्ट समजत नाही, त्यांना त्याचे भयंकर परिणामही भोगावे लागतात. आफ्रिकन प्राणीसंग्रहालयातील असाच एक व्हिडिओ (Horrifying Video of Lion Attack) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने थेट सिंहासोबत मस्ती करायला सुरुवात केली आणि काहीच वेळात त्याला त्याची किंमत चुकवावी लागली (Lion Ripped Off Man’s Finger). OMG: बघता-बघता क्षणार्धात त्याचा स्टंट फसला, उंचावरून भंयकर पद्धतीनं कोसळला तरूण थरकाप उडवणारा हा व्हिडिओ जमायकाच्या प्राणीसंग्रहालयातील आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे, जो इथे फिरण्यासाठी आला असावा. सर्वजण सिंहासोबत त्याचे फोटो घेत आहेत आणि व्हिडिओ बनवत आहेत. मात्र तो करत असलेली मस्ती कदाचित सिंहाला अजिबातही आवडली नाही. यानंतर या व्यक्तीसोबत जे काही घडलं, ते एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती सिंहाच्या पिंजऱ्याबाहेर उभा असल्याचं दिसतं आणि पिंजऱ्याच्या आतून सिंह त्याला पाहत आहे. सिंहाला इतक्या जवळून पाहूनही या व्यक्तीचं समाधान होत नाही आणि तो पिंजऱ्याच्या आतमध्ये बोटं घालून सिंहासोबत खेळू लागतो. ही गोष्टी जंगलाच्या राजाला अजिबातही आवडत नाही. सुरुवातीला तो काहीच करत नाही, पण थोड्या वेळाने रागावलेला सिंह या व्यक्तीची बोटं आपल्या जबड्यात पकडतो. यानंतर मात्र या व्यक्तीला घामच फुटतो. खूप प्रयत्नानंतर तो आपला हात सिंहाच्या जबड्यातून बाहेर काढण्याच यशस्वी ठरतो. मात्र यात त्याच्या हाताच्या बोटाची हाडंच वाचली आणि मांस सिंहाने ओढून खाल्लं Shocking Video! लग्नात नाचता नाचता अचानक गेला व्यक्तीचा जीव; कॅमेऱ्यात कैद झाला 'मृत्यू' @OneciaG नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून एका यूजरने हा भयानक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याने व्हिडिओसोबत जमायकन म्हणही लिहिली आहे. यात त्याने म्हटलं की, दिखावा करण्याच्या नादात अपमानच होतो. हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यापासून आतापर्यंत 3.6 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे. यावर हजारो लोकांनी कमेंट करत या व्यक्तीच्या मूर्खपणावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking video viral, Wild animal

    पुढील बातम्या