मराठी बातम्या /बातम्या /Viral /एका मित्राचा सूट, दुसऱ्याचा लॅपटॉप घेऊन दिला नोकरीसाठी Interview; पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला वाटेल कौतुक

एका मित्राचा सूट, दुसऱ्याचा लॅपटॉप घेऊन दिला नोकरीसाठी Interview; पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला वाटेल कौतुक

online इंटरव्ह्यूचा (Virtual Interview) ट्रेंड वाढला आहे

online इंटरव्ह्यूचा (Virtual Interview) ट्रेंड वाढला आहे

देशातील कित्येक विद्यार्थी हे अतिशय बिकट परिस्थितीमधून पुढे येत नाव कमवतात. अशाच एका तरुणाची गोष्ट सध्या लिंक्डइन या साईटवर प्रसिद्ध होते आहे.

  नवी दिल्ली, 10 डिसेंबर : देशातील कित्येक विद्यार्थी हे अतिशय बिकट परिस्थितीमधून पुढे येत नाव कमवतात. अशाच एका तरुणाची गोष्ट सध्या लिंक्डइन या साईटवर प्रसिद्ध होते आहे. टेडएक्स स्पीकर आणि आंत्रप्रन्योर विशाल भारद्वाज (Entrepreneur Vishal Bhardwaj) यांनी एका अशा तरुणाचा किस्सा सांगितला, जो मुलाखतीला येताना आपल्या मित्राचा सूट घालून (Man wore friend’s clothes for interview) आला होता. ते इंटर्नशिपसाठी मुलाखती घेत होते. जेव्हा झारखंडच्या या तरुणाने त्यांचे मन जिंकले. विशाल यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

  विशाल आपल्या पोस्टमध्ये (Vishal Bhardwaj LinkedIn post) लिहितात, “व्हिडीओ कॉलवरील मुलाखतीसाठी सहसा तरुण साधेच कपडे वापरतात. पण हा मुलगा अगदी सूट आणि टाय घालून इंटरव्ह्यू देत होता. काही वेळ बोलल्यानंतर आम्ही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा करू लागलो. त्याने सांगितलं, की परिस्थिती नसतानाही त्याच्या आई-वडिलांनी कशा प्रकारे त्याच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. शिवाय त्याने प्रामाणिकपणे हेदेखील कबूल केलं, की त्याने घातलेला सूट त्याच्या एका मित्राचा आहे, आणि मुलाखतीसाठी वापरत असलेला लॅपटॉपही दुसऱ्या मित्राचा (Man borrowed friend’s Laptop for interview) आहे. त्याच्या मित्रांनी मुलाखतीसाठी तयारी करताना त्याची मदत केलीच, पण मुलाखतीच्या आधी त्याच्या पाठीमागे दिसणारं बॅकग्राऊंड अधिक चांगलं दिसावं यासाठी पडदे, फुलं लावून सजावटही केली.” ही माहिती ऐकल्यानंतर भारद्वाज भलतेच खूश झाले होते.

  याला म्हणतात नशीब! एका चुकीने बनवलं मालामाल; रातोरात करोडपती झाला हा व्यक्ती

  यानंतर या उमेदवाराने त्याच्या मित्रांनाही भेटण्याची भारद्वाज यांना विनंती केली. त्यांनीदेखील ही विनंती स्वीकारत, त्याच्या मित्रांना व्हिडीओ कॉलमध्ये येण्यास सांगितले. या सर्वांशी थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर भारद्वाज यांनी या उमेदवाराची निवड (Vishal Bhardwaj impressed by Jharkhand youngster) करण्यात आल्याचे जाहीर केले.

  Twitter CEO Parag Agrawal यांचा CV व्हायरल, मोठी बाब उघडकीस

  “त्याची निवड झाल्याचे जाहीर होताच, त्याच्या कुटुंबियांपेक्षाही त्याचे मित्र जास्त आनंदी झाले होते. तो आयुष्यात पुढे भरपूर पैसे कमावेल, पण या मित्रांसारखी मौल्यवान संपत्ती त्याने आधीच कमावली आहे. तो सध्या श्रीमंत आहेच, पुढे तो भरपूर पैसेही मिळवेल याची मला खात्री आहे. अशी माणसं आणि असे मित्र हीच खरी संपत्ती आहेत.” असेही भारद्वाज पुढे म्हणाले. या तरुणाला नोकरी देण्यावरच भारद्वाज थांबले नाहीत, तर आपण आपल्या कंपनीकडून त्या तरुणाला आणि त्याच्या तिन्ही मित्रांना कस्टमाईज्ड सूट पाठवणार असल्याचे विशाल यांनी जाहीर केले. “या सर्वांना सुटाबुटात तयार झालेलं पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे” असंही ते म्हणाले.

  जॉब मिळताच तरुणीने रस्त्यावर असं काही की CCTV VIDEO पाहून बॉसनेही जोडले हात

  दरम्यान, लिंक्डइनवर या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. कित्येक लोक यावर आपलेही अनुभव शेअर करत आहेत. एमएसएन या इंटरनॅशनल कंपनीत प्रिन्सिपल कन्सल्टन्ट असणाऱ्या मनोज एसएन यांनी आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून अजूनही आपल्या शाळेतील मित्रांच्या संपर्कात असल्याचे म्हटले. तर, विशाल यांच्या कंपनीमधील वर्क कल्चर पाहून, आपल्यालाही तिथे काम करण्याची इच्छा होत असल्याचे मत कॉरटेक एनर्जी कंपनीतील इंजिनिअर मणियार यांनी व्यक्त केले.

  First published:

  Tags: Viral post