मुंबई, 24 जानेवारी : सोशल मीडियावर जगभरात एक नवीन चॅलेंज ट्रेंड होत आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचा प्रोफाइल फोटो कसा असेल... तो एकच असेल की वेगवेगळा असेल? अर्थातच ऑनलाइन किडा असणाऱ्या व्यक्तीला याचं उत्तर नक्कीच माहीत असतं. #linkedinfacebookinstagramtinder चॅलेंज नावाचं एक नवीन चॅलेंज सध्या जगभरातल्या सेलेब्रिटींनाही भुरळ घालत आहे. LinkedIn, Instagram, Facebook, Tinder या वेगवेगळ्या धर्तीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे कसे फोटो असतील याची मीम्स (Memes) सध्या व्हायरल होत आहेत.
सुरुवातीला हॉलिवूडमध्ये सुरू झालेला हा ट्रेंड आता बॉलिवूडमध्ये आला आहे. एवढंच नाही तर असे फोटो मीम्स शेअर करण्यात मराठी सेलेब्रिटीही मागे नाहीत, हे सई ताम्हणकरचा फोटो व्हायरल झाला तेव्हा समजलं.

या ट्रेंडची सुरुवात झाली, डॉली पार्टन हिने हा धमाल फोटो कोलाज शेअर केला आणि Get your woman who can do it all असं लिहून तिने हे फोटो शेअर केले.
जॅनेट जॅक्सनने तर टॉपलेस फोटो टिंडरसाठी सिलेक्ट करून सोशल मीडियावर धूम केली.
मग हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये हा ट्रेंडच सुरू झाला. अनेक सेलेब्रिटींनी यामध्ये स्वतः भाग घेतला. तर काहींचे फोटो फॅन्सनी व्हायरल केले. करीना कपूरचा हा फोटो तिच्या टीमच्या पेजवर शेअर झाला आहे.
आयुष्मान खुरानाने तर फेसबुकसाठी आपला लहानपणचा फोटो टाकला आहे. त्याचा टिंडरवरचा फोटो पाहिलात तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मजा कळेल.
यात मराठी सेलेब्रिटीसुद्धा मागे नाहीत. सई ताम्हणकरने टिंडरबरोबरच अगदी LinkedIn आणि Instagram साठीही Hot Photo टाकले आहेत.

नवाझुद्दीन सिद्दीकीचा तर शादी.कॉमसाठीसुद्धा एक फोटो शेअर झालाय. हा ट्रेंड त्यामुळे आणखी गमतीशीर झाला आहे.

मुळात हा ट्रेंड हॉलिवूडमध्ये सुरू झाला. अनेक ब्रिटीश, अमेरिकन सेलेब्रिटींनी आपापले Instagram, LinkedIn, Facebook, Tinder फोटो शेअर केले आणि एकमेकांना चॅलेंज केलं. त्यात आता भारतीय सेलेब्रिटी उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा मीम्सचा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

अनेक सेलेब्रिटींनी यात भाग घेतला आणि स्वतः फोटो शेअर केले. तर काही सेलेब्रिटींचे फोटो इतर यूजर्सनी किंवा फॅन्सची मीम्स बनवून व्हायरल केले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.