मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अद्भुत! अवघ्या 20 सेकंदात Octopus ने बदलले कितीतरी रंग; Must Watch Video

अद्भुत! अवघ्या 20 सेकंदात Octopus ने बदलले कितीतरी रंग; Must Watch Video

सरड्यापेक्षाही फास्ट या ऑक्टोपसने आपला रंग बदलला आहे.

सरड्यापेक्षाही फास्ट या ऑक्टोपसने आपला रंग बदलला आहे.

सरड्यापेक्षाही फास्ट या ऑक्टोपसने आपला रंग बदलला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 जुलै : रंग बदलणारा प्राणी म्हटलं की आपल्यासमोर सरडाच येतो. सरडा रंग बदलतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ठिकाणानुसार आपल्या बचावासाठी सरडा रंग बदलतो.  पण कधी सरड्याप्रमाणे रंग बदलणारा ऑक्टोपस पाहिला आहे का? (Octopus changed colour) रंग बदलणारा ऑक्टोपस कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रंग बदलणाऱ्या ऑक्टोपसचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. निसर्गाचा हा अद्भुत असा चमत्कारच म्हणावा लागेल.

ऑक्टोपसचे बरेच व्हिडीओ (Octopus video)  तुम्ही पाहिले असतील. पण असा व्हिडीओ तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल. त्यामुळे हा व्हिडीओ पाहूनच तुम्ही हैराण व्हाल. व्हिडीओत पाहू शकता जिथं जिथं हा ऑक्टोपस जातो तिथं तिथं त्या ठिकाणानुसार तो आपला रंग बदलो. शेवटी तो एका खडकाजवळ जातो आणि त्या खडकाप्रमाणेच होतो.

@wonderofscience ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. अवघ्या 20 सेकंदात ऑक्टोपस किती तरी रंग बदलतो. फक्त रंगच नव्हे तर त्याचं रूपही बदलताना दिसतं.  व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. बहुतेकांनी याची तुलना एलियन्सशी केली आहे. हा समुद्रात राहणारा एलियन असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचा - निसर्गाची किमया : समुद्रातील या प्राण्यांनाही सरड्याप्रमाणे बदलता येतो रंग

रंग बदलणाऱ्या ऑक्टोपसचा हा पहिला व्हिडीओ नाही. याआधीही अशाच एका ऑक्टोपसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. Buitengebieden ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. हा ऑक्टोपस झोपेत आपला रंग बदलताना दिसला.

सुरुवातीला हा ऑक्टोपस पांढराशुभ्र होता. त्यानंतर हळूहळू त्याचा रंग पिवळा होतो. मध्येच हिरवा होतो. पाहता पाहता हा पांढरा ऑक्टोपस कलरफूल बनतो.  फक्त रंगच नाही तर ऑक्टोपस आपला आकारही बदलताना दिसतो आहे. मध्येच त्याच्या शरीरावर स्पाइक म्हणजे काट्यासारखी रचना झाल्याचंही दिसलं.

हे वाचा - ...अन् छोट्याशा बछड्यासमोर वाघिणीची हवा टाईट; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

रंग बदलणारा ऑक्टोपस पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं आहे. ऑक्टोपससुद्धा रंग बदलतो यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. व्हिडीओ प्रत्यक्षात पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. बहुतेकांना हे स्वप्न वाटतं आहे.

तुम्हाला रंग बदलणारा ऑक्टोपस कसा वाटला? त्याला पाहून तुम्हाला काय वाटतं? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Other animal, Viral, Viral videos