मुंबई, 26 ऑक्टोबर : बिबट्या अनेकदा वस्तीत रात्री घुसल्याच्या घटना समोर येत असताना आता त्याने एका पाळलेल्या प्राण्याची चक्क घरात घुसून शिकार करण्याची हिंमत केली आहे. बिबट्याने बंगल्याची सावज हेरून त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. यादरम्यान शिकारीचा हा Shoking प्रसंग इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की बिबट्या एका पाळीव प्राण्याची शिकर करण्यासाठी इमारतीत घुसला. हा प्राणी त्याच्या तावडीतून सुटून जीव घेऊन गेटखालून पळाला. मात्र बिबट्यानं हे अंतर कापण्यासाठी थेट गेटवरून एका दमात उडी मारल्याचं पाहायसा मिळालं. हा प्राणी नेमका कुत्रा होता की मांजर हे अद्याप नीट समजू शकलं नाही यावरून सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
Really don't know the source, got it as a forward on #watsapp
But just witness the agility and skills of the #Leopard.
हा व्हिडीओ आतापर्यंत 34 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 62 लोकांनी कमेंट्स केल्या तर 600 हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडीओवर अनेक युझर्सनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एक युझर म्हणतो की हा बिबट्या सावज पकडू शकला असेल असं वाटत नाही. तर दुसरा म्हणतो या बिबट्यानं किती परफेक्ट जंप मारली आहे. तर तिसरा म्हणतो की कुत्रा आहे की मांजर हे अद्याप कळू शकलं नाही.