पुणे : हल्ली रहदारीच्या ठिकाणी बिबट्यांचा सुळसुळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बहुतांश ठिकाणी बिबटा फिरत असल्याचा किंवा बिबट्याने हल्ला केल्याच्या बातम्या जोर धरत आहेत. त्यात आता पुण्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ तुमच्या हृदयाचे ठोके चुकवेल.
हा व्हिडीओ बिबट्याचा आहे, जो एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की बिबट्याने एका गाडीवरु एन्ट्री केली आणि तेथून तो सुसाट पळत सुटला. त्या दरम्यान एका एक व्यक्ती तेथेच कार धुत होता. या व्यक्तीचे प्राण थोडक्यात वाचला आहे.
बिबट्या दररोज शेतात येऊन करतो काय? शेतकऱ्याने CCTV पाहिला आणि त्याला धक्काच बसला
ही घटना सकाळी सातच्या सुमाराची आहे. तेथे एक व्यक्ती आपली गाडी धुत होती. तेव्हाच त्याच्या बाजूने बिबट्याने उडी घेतली. हे पाहाता ती व्यक्ती घाबरली आणि कारच्या आतमध्ये जाण्यासाठी पाहात होती. पण तो बिबट्या तेथे न थांबता तेथून पळून गेला. ज्यामुळे ही व्यक्ती थोडक्यात बचावली. नाहीतर या व्यक्तीसोबत काय घडू शकलं असतं हे काही वेगळं सांगायला नको.
पुण्यात बिबट्याची एन्ट्री, कार धूत असलेल्या व्यक्तीच्या बाजूने गेला बिबट्या. अखेर दोन तसांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला चॅरिटेबल ट्रस्टच्या भूगाव रॅम्पवर हलवण्यात आलं.#Leopard #viral #shocking #wildlife pic.twitter.com/vrp799imLo
— News18Lokmat (@News18lokmat) March 20, 2023
या घटने माहिती तातडीने वनविभाग आणि पोलिसांना कळविण्यात आली. तेव्हा घटनास्थळी रेस्क्यू फाऊंडेशनची टीम पोहोचली आणि रेस्क्यू ॲापरेशन सुरू करण्यात आलं, मात्र जाळी लावलेली असताना ही बिबट्या त्यातून निसटला आणि जवळ असलेल्या शेड मध्ये शिरला साधारण ९ वाजता डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं, त्यानंतर साधारण ९.३० ते दहाच्या दरम्यान बेशुध्द बिबट्याला तातडीने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या भूगाव रॅम्पवर हलवण्यात आलं.
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे, जे पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. लोक आपल्या प्रतिक्रिया देखील या व्हिडीओवर मांडत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Top trending, Viral, Wild life