मराठी बातम्या /बातम्या /Viral /बिबट्याने केली माकडाची शिकार; आईच्या मृतदेहालाच बिलगून बसलं पिल्लू, VIDEO पाहून व्हाल भावुक

बिबट्याने केली माकडाची शिकार; आईच्या मृतदेहालाच बिलगून बसलं पिल्लू, VIDEO पाहून व्हाल भावुक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे छोटं माकड आपल्या आईला बिलगून बसलं आहे. त्याच्या आईला बिबट्याने मारलं आहे

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे छोटं माकड आपल्या आईला बिलगून बसलं आहे. त्याच्या आईला बिबट्याने मारलं आहे

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे छोटं माकड आपल्या आईला बिलगून बसलं आहे. त्याच्या आईला बिबट्याने मारलं आहे

नवी दिल्ली 02 डिसेंबर : आई हा शब्द या जगातील सर्वात सुंदर शब्द आहे. आईशिवाय सगळं अपूर्णच आहे. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांवर भरपूर प्रेम (Mother Love) करते, तसंच मुलंही आपल्या आईवर तितकंच प्रेम करतात. मुल लहान असो किंवा मोठं पण त्याच्यासाठी सर्वात जवळची त्याची आईच असते. आई नसली की घराला घरपण आल्यासारखं वाटत नाही. आईच असते, जी आपली संपूर्ण काळजी घेते.

केवळ माणूसच नाही तर प्राणीही आपल्या आईवर खूप प्रेम करतात. आज आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील (Emotional Video of Monkey). हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचाही थरकाप उडेल. या व्हिडिओमध्ये एक लहान पिल्लू आणि त्याच्या आईंमधील असं अतूट प्रेम पाहायला मिळतं, जे कोणालाही विचार करायला भाग पाडेल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक मादी माकड आणि तिच्या पिल्लामधील प्रेम आणि आपुलकी पाहायला मिळते. या माकडाची एका बिबट्याने शिकार (Leopard Hunted Monkey) केली आहे आणि माकडाला आपल्या जबड्यात पकडून तो घेऊन जात आहे. याच व्हिडिओमध्ये दिसतं की या मादी माकडाच्या शरीरालाच तिचं पिल्लू बिलगून बसलं आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे छोटं माकड आपल्या आईला बिलगून बसलं आहे. त्याला आपल्या आईला सोडायचं नाही. त्याच्या आईला बिबट्याने मारलं आहे. मात्र, हे पिल्लू आपल्या आईच्या मृत शरीराला बिलगून बसलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मृत माकडाला आपल्या जबड्यात पकडून बिबट्या पुढे चालत आहे.

बिबट्याने जेव्हा या माकडाची शिकार केली तेव्हा हे पिल्लूही माकडासोबतच होतं. बिबट्याने माकडाची शिकार केली, मात्र तिच्या पिल्लाला मारलं नाही. मात्र आपल्या आईच्या मृत्यूनंतरही माकडाचं पिल्लू तिला सोडायला तयार नव्हतं. बिबट्याला न घाबरता ते आपल्या आईच्या शरीराला बिलगून राहिलं. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि भावुकही व्हाल. ट्विटरवर हा व्हिडिओ @iftirass नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे.

First published:

Tags: Emotional, Video Viral On Social Media