नवी दिल्ली 01 एप्रिल : दररोज आपल्याला वन्यजीवांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओमध्ये प्राण्यांची लढाई पाहायला मिळते तर काही व्हिडिओमध्ये माणूस आणि प्राण्यांमधील खास नातं. काही व्हिडिओ असे असतात, जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक बिबट्या माणसांवर हल्ला करण्याऐवजी त्यांना पाळीव श्वानाप्रमाणे मिठी मारताना दिसत आहे. जे पाहिल्यानंतर यूजर्स भीतीने थरथर कापू लागले.
Video : भल्यामोठ्या किंग कोब्रावर तरुणाने ओतलं पाणी, पुढे जे घडलं ते पाहून बसेल धक्का
अनेकदा बिबट्या शहरातून दूरवरच्या भागात जाऊन प्राण्यांची शिकार करताना दिसतात. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हायरल होतात. बिबट्या हा अतिशय धोकादायक प्राणी आहे. जे निर्दयीपणे प्राण्यांची शिकार करतात. डोंगराळ प्रदेशात अनेकवेळा अचानक समोर आल्यावर ते माणसांनाही मारण्यापासून मागे हटत नाहीत. मात्र आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बिबट्या माणसासोबत खेळताना पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
A random encounter with a leopard in indian mountain pic.twitter.com/ITURN2QHQ2
— Humans Are Metal (@HumanAreMetal) March 31, 2023
व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा आहे, पण तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला Humans Are Metal नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक बिबट्याचं पिल्लू जंगलातून भटकत रस्त्यावर आलेलं दिसतं आणि त्याला पाहून वाहतूक ठप्प होते. यानंतर काही लोक त्यांच्या वाहनातून खाली उतरतात, त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी बिबट्या त्यांच्याशी खेळू लागतो.
व्हिडिओमध्ये बिबट्या एकाच व्यक्तीला पुन्हा पुन्हा मिठी मारताना दिसत आहे. या दरम्यान ती व्यक्ती देखील घाबरण्याऐवजी शांत राहते. त्यानंतर तो बिबट्या तिथून निघून जातो. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर ४ लाख १० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, 19 हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी लाईक केला आहे. दुसरीकडे, व्हिडिओ पाहणारे बहुतेक वापरकर्ते आश्चर्यचकित आहेत की बिबट्याने मिठी मारल्यानंतरही ती व्यक्ती शांत कशी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Shocking video viral