मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : एक फाइट...! शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला साळींदरानं असं पळवलं

VIDEO : एक फाइट...! शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला साळींदरानं असं पळवलं

साळींदर आणि बिबट्या यांच्यातील शिकारीचा खेळ कसा रंगला पाहा video

साळींदर आणि बिबट्या यांच्यातील शिकारीचा खेळ कसा रंगला पाहा video

साळींदर आणि बिबट्या यांच्यातील शिकारीचा खेळ कसा रंगला पाहा video

मुंबई, 01 ऑगस्ट: अंगावर आलं की शिंगावर घेऊ हा अगदी मनुष्य प्राण्यापासून ते प्राण्यापर्यंत निसर्गाचा नियम आहे. देवानं प्रत्येक प्राण्याला आपला बचाव करण्यासाठी एक विशिष्ट गोष्ट म्हणा किंवा ताकद म्हणा दिली आहे. एवढासा जीव असणाऱ्या साळींदराची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याच्या पिल्ला या साळींदरानं चांगलाच धडा शिकवला.

दोघांच्या लढाईचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आपल्याला माहीत आहे साळींदर हे खूप काटेरी असतं. या साळींदराची शिकार तर दूरच पण उभं राहण्याची बिशाद ती काय? नुसतं काटे टोचतील इतके काटे या साळींदराच्या अंगावर पाहून आपल्यालाच शहारे येतात. तिथे मात्र शिकारीचे नवे डावपेच शिकलेल्या बिबट्याच्या पिल्लानं त्याची शिकार करण्याचं धाडस केलं आणि फसला.

हे वाचा-एका फोटोत 4 नाहीत तर 7 हत्ती; विश्वास बसत नाही तर VIDEO पाहा

बिबिट्या अंदाज घेऊन वार करत असतानाच साळींदरानं एक जोरात आपल्या काट्यांनी फाइट दिली आणि बिबट्याची पाऊल मागे गेली मात्र त्यानं शिकारीचे प्रयत्न सोडले नाहीत. साळींदरानंही आपल्या बचावाची सगळी हत्यारं वापरली मग काय दोघांमध्ये लढाई सुरू झाली. साळींदर आपला जीव वाचवण्यासाठी आणि बिबट्या शिकार करण्यासाठी लढत एकमेकांशी लढत होते.

बिबट्या या आणि साळींदराच्या या लढाईचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ifs अधिकारी जगन सिंग यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवर शेअर केला. हा व्हिडीओ आतापर्यंत साडेतीन हजार लोकांनी पाहिला असून अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. प्रत्येक सजीव व्यक्तीकडे आपलं संरक्षण करण्यासाठी एक विशिष्ट तंत्र असतं आणि त्याचा योग्य वापर करण्याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं सिंग यांनी व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: Social media, Twitter, Viral video.