मुंबई, 10 सप्टेंबर : लॉकडाऊनपासून सोशल मीडियावर अनेक प्राण्याचे व्हिडीओ पाहाणं लोकांनी पसंत केलं. कधी बिबट्याने केलेल्या शिकारीचा तर कधी बिबट्याच्या तोंडातून शिकार सुटल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळाला. मात्र आता संकटात सापडलेल्या बिबट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता बिबट्या नदी पार करताना मध्यभागी पूल तुटला आहे आणि बिबट्याच्या लक्षात येताच तो नीट आपली जागा घेऊन किती लांब उडी मारावी लागेल याचा अंदाज घेतो आणि उडी मारतो. ही उडी योग्य जाते आणि पुढे आणखीन तीन उड्या मारून बिबट्या नदी पार करतो. हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे.
The Pandemic so far👇
A long jump from February to March.
Then a rapid transition to April, May, June, July, August.
सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना या बिबट्यानं मारलेल्या उडीची तुलना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसोबत केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण कमी होते मात्र कसे वेगानं वाढत जात आहेत याचं हे उदाहरण म्हणायला हवं.
या व्हिडिओमध्ये बिबट्या नदीचा पूल ओलांडताना दिसला. नदीवर बांधलेला पूल मध्यभागी तुटल्यानं उडी मारून बिबट्या पार करतो. यात बिबट्याची उडी चुकली तर थेट नदीत वाहून जाण्याची भीती असते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ 4 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडीओमधून कोरोनाचे रुग्ण तीन महिन्यात कसे वाढले याचं उदाहरण IFS सुशांत नंदा यांनी दिल्यानंतर अनेक युझर्सनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. बिबट्याच्या अचूक उडीचंही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.