माकडाची शिकर करण्यासाठी झाडावर चढला बिबट्या, पुढे काय झालं पाहा VIDEO

माकडाची शिकर करण्यासाठी झाडावर चढला बिबट्या, पुढे काय झालं पाहा VIDEO

बिबट्या आणि माकडाच्या शिकारीच्या खेळात कुणाला घ्यावी लागली माघार, पाहा VIDEO

  • Share this:

मुंबई, 05 जून: काही दिवसांपूर्वी माकडानं वाघाची खोड काढल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता माकडाच्या शिकारीसाठी चक्क बिबट्यानं नजर ठेवून पाठलाग केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्याला कोणत्याही परिस्थित शिकार गमवायची नव्हती तर माकडाला आपला जीव वाचवायचा होता. या दोघांमधल्या लढाईचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

IFS ऑफिसर सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये आपण पाहू शकता बिबट्या शिकार करण्यासाठी माकडाच्या मागे झाडावर चढतो अगदी फांदीच्या टोकापर्यंत तो आपले प्रयत्न सोडच नाही. तर दुसऱ्या बाजूला घाबरलेल्या अवस्थेत माकड झाडाच्या शेंड्याला अगदी घट्ट पकडून आहे.

असं दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. बिबट्यानं या वानराची शिकर करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले अगदी धाडस करून झाडावरील फांदीच्या टोकापर्यंत गेला. परंतु वानराने आपली आशा सोडली नाही आणि फांदीच्या टोकाला पकडून लटकत राहिला.

शिकारीच्या खेळात बिबट्याला अखेर हार मानावी लागली. झाडावरून पडण्याच्या भीतीनं पळ काढावा लागला. माकडाच्या धीरानं आणि आशा बाळगलेल्यानं त्याची शिकार झाली नाही. या माकडाचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. हा व्हिडीओ 4.9 हजार लोकांनी पाहिला असून 95 युझर्सनी रिट्वीट केला आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

 

First published: June 5, 2020, 1:01 PM IST

ताज्या बातम्या