Home /News /viral /

Shocking Video - जंगलातून रस्त्यावर येताच सायकलस्वाराला धडकला बिबट्या; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं

Shocking Video - जंगलातून रस्त्यावर येताच सायकलस्वाराला धडकला बिबट्या; पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं

सायकलस्वारासमोर अचानक बिबट्या आला आणि पुढे जे घडलं ते भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

    मुंबई, 17 जून : साध्या बाईकमागे श्वानं धावली तरी बाईकस्वार जीव मुठीत धरून पळतात. बाईकमागे धावणाऱ्या श्वानांचा वेगही तुम्ही पाहिला असेल. पण जर श्वानाच्या जागी बिबट्या आणि बाईकच्या जागी सायकल असेल तर...  (Leopard attack video) फक्त कल्पना करूनच घाम फुटला ना. पण असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे (Leopard attack on bicycle rider). एखाद्या गाडीसमोर बिबट्या आला तरी अनेकांच्या अंगाला घाम फुटतो. गाडी तर तशीही सर्व बाजूंनी बंद असते. त्यामुळे तसा बिबट्याने हल्ला करण्याचा धोका कमी पण जर एखाद्या सायकलजवळच बिबट्या आला तर... दृश्य पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. बिबट्या आणि सायकल एकमेकांना धडकल्यानंतर पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे. व्हिडीओत पाहू शकता तशी रस्त्यावर वर्दळ आहे. म्हणजे वाहनांची रस्त्यावरून ये-जा आहे. एक तरुण सायकलवरून आपल्याच धुंदीत रस्त्याच्या कडेने आरामात जाताना दिसत आहे. तो हळूहळू सायकल चालवतो आहे. इतक्यात रस्त्याच्या शेजारी असलेल्या जंगलातून एक प्राणी वेगाने धावत येत त्या सायकलला धडकतो. तुम्ही नीट पाहिलं तर हा प्राणी श्वान किंवा दुसरा कोणता साधासुधा प्राणी नव्हे तर चक्क एक बिबट्या आहे. हे वाचा - बापरे! या विचित्र जीवाला पाहून सर्वांना फुटला घाम; हा कोण आहे तुम्हाला माहितीये का? हा बिबट्या जंगलातून रस्त्यावर धावत येत खरंतर त्या सायकलस्वारावर झेप घेत त्याच्यावर हल्लाच करतो. बिबट्याचा हल्ला इतक्या जोरात आहे की त्याच्या धक्क्याने सायकलस्वार सायकलसह जमिनीवर कोसळतो. त्याचक्षणी आपल्या काळजाचा ठोका चुकतो. पण पुढे जे घडलं ते यापेक्षाही धक्कादायक आहे. या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून तो बिबट्याच्या तावडीत तो काही सापडत नाही. रस्त्यावर वर्दळ असल्याने हल्ला केल्यानंतर सायकलस्वार पडताच बिबट्याही तिथून लगेच पळ काढतो. तो पुन्हा जंगलात जातो. सुरुवातीला त्या व्यक्तीला नेमकं काय झालं ते कळतच नाही. पण आपल्यावर हल्ला करणारा प्राणी बिबट्या होता हे समजताच तोही आपली सायकल घेऊन तिथून पटापट उठतो आणि सायकल पुन्हा मागे वळवून तिथून पळ काढतो. तिथून जाणारे काही गाडीचालक तिथं थांबतात त्यांनाही थोडा वेळ नेमकं काय झालं हे समजत नाही. पण जेव्हा त्यांना बिबट्याने या तरुणावर हल्ला केल्याचं समजतं तेव्हा तेही घाबरलेले दिसतात. हे वाचा - उफ्फ! चक्क एका माकडीणीवर फिदा झाले नेटिझन्स; VIDEO पाहाल तर तुम्हालाही समजेल नेमकं कारण आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअऱ केलेला हा व्हिडीओ फक्त 45 सेकंदाचा आहे. पण पाहताच अंगावर अक्षरशः काटा येतो.  'या सायकलस्वाराचा आपल्या नशीबावर विश्वासच बसत नव्हता', असं त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे. तर या व्हिडीओवर कमेंट करताना एका युझरने सायकलस्वार तरुण आणि बिबट्या दोघंही नशीबवान असल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Leopard, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या