मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बिबट्या आला रे आला! गावात घुसून वाटेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला...; थरकाप उडवणारा VIDEO

बिबट्या आला रे आला! गावात घुसून वाटेत येणाऱ्या प्रत्येक माणसाला...; थरकाप उडवणारा VIDEO

गावात घुसून बिबट्याने माणसांवर भयानक हल्ला केला आहे. बिबट्याचा हा उच्छाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गावात घुसून बिबट्याने माणसांवर भयानक हल्ला केला आहे. बिबट्याचा हा उच्छाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गावात घुसून बिबट्याने माणसांवर भयानक हल्ला केला आहे. बिबट्याचा हा उच्छाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 02 ऑगस्ट : गावात बिबट्या घुसला, बिबट्याचा हल्ला अशा बातम्या तुमच्या कानावर पडत असतात, तुम्ही पाहत असता. अशाच एका गावात घुसलेल्या एका बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गावात घुसून बिबट्याने उच्छाद मांडला आहे. वाटेत येणाऱ्या प्रत्येक माणसावर बिबट्याने खतरनाक हल्ला केला आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. एका गावात बिबट्याने दहशत निर्माण केली. बिबट्याला पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला. यानंतर बिबट्याने माणसांवर भयानक हल्ला केला आहे. बिबट्या पळत असताना त्याच्या मार्गात येणाऱ्या एकेका माणसाला त्याने आडवा करत त्याच्यावर हल्ला केला आहे. व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी बिबट्या पडला आहे. त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी म्हणून काही लोक पुढे येतात. ती भिंतीच्या कठड्यावरून खाली वाकून पाहतात. तोच बिबट्या अचानक कठड्यावर येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. त्यानंतर तिथून तो पळत सुटतो. हे वाचा - मगरीने पिल्लाला जबड्यात धरलं, वाचवण्यासाठी आईने पायाखाली तुडवून मारलं; पाहा VIDEO बिबट्याला पाहण्यासाठी बरीच गर्दी जमा झाली आहे. लोक आपल्या घरातून बाहेर रस्त्यावर, छतावर आले आहेत. बिबट्या या माणसांच्या गर्दीतून पळत सुटतो आणि वाटेत येणाऱ्यावर हल्ला करत जातो. बिबट्याला पाहण्यासाठी आलेले लोक बिबट्या जवळ येताच जीव मुठीत धरून पळू लागतात. पळता पळता काही लोक पडले. त्यांच्यावर बिबट्याने अटॅक केला. त्यांना चावण्याचाही प्रयत्न केला. पण सुदैवाने या व्हिडीओत तरी कोणता माणूस त्या बिबट्याची शिकार झालेला दिसत नाही. बिबट्याने कुणाला गंभीर दुखापत केलेली नाही. हे वाचा - आश्चर्य! म्हशीच्या पोटी जन्माला आलं 4 डोळ्यांचं रेडकू; विचित्र पिल्लाला पाहून डॉक्टर म्हणाले, 'असे प्राणी...' Vicious Videos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर ऱ्याच कमेंट येत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
First published:

Tags: Leopard, Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या