मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्रा भुंकला तो शेवटचा! बिबट्याने अक्षरश: दोर तोडून ओढत नेलं, LIVE VIDEO

कुत्रा भुंकला तो शेवटचा! बिबट्याने अक्षरश: दोर तोडून ओढत नेलं, LIVE VIDEO

इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील वाघोबाची वाडीत ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नाशिक, 07 डिसेंबर : नाशिक, अहमदनगर आणि आता बीडच्या आष्टीमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचा घटना वारंवार समोर येत आहे.  इगतपुरीमध्ये तर भरदिवसा बिबट्याने (leopard) पाळीव कुत्र्यावर (Dog) हल्ला करून ठार मारले. नुसते ठार मारले नाहीतर कुत्रा बांधलेला असताना दोर तोडून त्याला खेचूनही नेलं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील वाघोबाची वाडीत ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अवघ्या काही फुटांच्या अंतरावर या बिबट्याने कुत्र्याची शिकार केली आहे. बबन झोले या घराशेजारी अचानक बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांच्या पाळीव कुत्रा बिबट्यावर जोरजोरात भुंकत होता. कुत्र्याच्या आवाजामुळे बिबट्या त्याच्या अंगावर चाल करून आला. पाळीव कुत्रा बांधलेला असल्यामुळे त्याला कुठे पळ काढता आला नाही. त्यामुळे बिबट्याने हल्ला करून त्यांचा जागीच जीव घेतला. कुत्रा जागेवर ठार झाल्यानंतर त्याला खेचून नेण्याचा बिबट्याने प्रयत्न सुरू केला. पण, झाडाच्या खोडाला बांधलेला असल्यामुळे बिबट्याकडून कुत्रा काही पुढे खेचला जात नव्हता. त्याने जोरात ताकद लावली आणि कसाबसा कुत्रा थोडा थोडा पुढे सरकत होता. शिकार पुढे सरकत नसल्यामुळे बिबट्याने तिथेच फस्त करण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष विचलित होत असल्यामुळे पुन्हा त्याने कुत्र्याला पूर्ण ताकदीने खेचण्याचा प्रयत्न केला आणि अखेर कुत्र्याच्या गळात बांधलेला दोर तुटला. त्यानंतर क्षणाचा विलंब न करता बिबट्याने आपली 'शिकार गावली' या थाटात घेऊन पळ काढला. बिबट्याच्या शिकारीचा हा संपूर्ण घटनाक्रम मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला. बिबट्याची दहशतीमुळे गावात आता भीतीचे वातावरण पसरले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या