• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मदतीसाठी धावलेल्या तरुणांवर झेपावला बिबट्या आणि...; बचावाचा धडकी भरवणारा VIDEO

मदतीसाठी धावलेल्या तरुणांवर झेपावला बिबट्या आणि...; बचावाचा धडकी भरवणारा VIDEO

तरुण बचावासाठी धडपडत असताना बिबट्याने केला हल्ला.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑक्टोबर : प्राणी (Animal video) पाळीव असो वा जंगली, तो संकटात दिसताच त्याला मदत करणारे काही लोक आहेत. आपला जीव धोक्यात घालून हे लोक त्या प्राण्यांना वाचवतात. अशाच एका जंगली प्राण्याच्या रेस्क्यूचा व्हिडीओ सोशल मीडयावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकीच भरेल. कारण मदतीसाठी धावलेल्या तरुणांवर बिबट्याने भयंकर (Leopard attack video) असा हल्ला केला आहे (Leopard video). मानवी वस्तीत घुसलेल्या बिबट्यांची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. खाण्यापिण्याच्या शोधात हे बिबटे मानवी वस्तीत येतात. माणसांवर हल्ले करतात. पण काही वेळा त्यांचा हा प्रयत्न फसतो आणि ते स्वतःच अडचणीत सापडतात. असाच हा बिबट्या आहे, जो एका ठिकाणी अडकला. नागरिकांना याची माहिती होताच त्याला तिथून बाहेर काढण्यासाठी काही तरुण धडपड करत होते आणि अचानकपणे या बिबट्याने त्या तरुणांवरच झेप घेतली.
  व्हिडीओत पाहू शकता काही तरुण एका कट्ट्यावरून खाली जाळी सोडताना दिसत आहेत. तिथं खालीच एक बिबट्या अडकला आहे. बिबट्या घाबरलेला आहे, त्यामुळे जसं त्याला शक्य होतं आणि संधी मिळते तशी तो स्वतःच उडी मारतो आणि तरुणांच्या दिशेने झेपावतो. तरुणांवर हल्ला करतच तो तिथून धूम ठोकतो. हे वाचा - VIDEO - तुडवून, आपटून पाण्यातच मारून टाकलं, पिल्लांसाठी आईची मगरीशी थरारक झुंज बिबट्याने अटॅक केल्याने तरुण जमिनीवर कोसळतात. पण सुदैवाने त्यांना काही गंभीर दुखापत झाल्याचं तरी दिसत नाही आहे. शार्प वाइडलाइफ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: