मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - बिबट्यासारख्या खतरनाक प्राण्यालाही एकटा पुरून उरला साधा श्वान; क्षणात उलटवला डाव

VIDEO - बिबट्यासारख्या खतरनाक प्राण्यालाही एकटा पुरून उरला साधा श्वान; क्षणात उलटवला डाव

श्वानाची शिकार करणं बिबट्याला चांगलंच भारी पडलं. फक्त आवाजानेच बिबट्याने धूम ठोकली.

श्वानाची शिकार करणं बिबट्याला चांगलंच भारी पडलं. फक्त आवाजानेच बिबट्याने धूम ठोकली.

श्वानाची शिकार करणं बिबट्याला चांगलंच भारी पडलं. फक्त आवाजानेच बिबट्याने धूम ठोकली.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 31 मे : बिबट्या आणि श्वान आमनेसामने आले तर त्यांच्या लढाईत कोणं जिंकल असा प्रश्न विचारल्यास साहजिक कुणीही बिबट्याच म्हणेल (Leopard dog video). कारण दोघांच्याही ताकदीची क्षमता आपल्याला माहिती आहे. बिबट्यासमोर कितीतरी हिंस्र आणि ताकदवान प्राण्यांचाही टिकाव लागत नाही मग श्वान काय आहे...(Leopard attack on dog). पण हा साधा श्वान एकटा खतरनाक बिबट्यावर भारी पडला आहे. शिकारीसाठी आलेल्या बिबट्याचा डाव श्वानाने एका क्षणात उलटवून लावला आहे. श्वानाने बिबट्याची हवा चांगलीच टाइट केली आहे. फक्त त्याच्या आवाजानेच बिबट्याने धूम ठोकली आहे (Leopard fear dog). श्वानावर हल्ला करायला आलेला बिबट्या स्वतःच श्वानाला इतका घाबरला की तो शिकार सोडून तिथून आपलाच जीव वाचवण्यासाठी पळाला. बिबट्याची अशी अवस्था तुम्ही याआधी कधीच पाहिली नसेल. पहिल्यांदाच बिबट्याला पाहून त्याची दया येईल. व्हिडीओत पाहू शकता एक श्वान रस्त्यावर आरामात बसला आहे. इतक्या बाजूला असलेल्या जंगलातून एक बिबट्या त्यााल पाहतो. शिकार करण्यासाठी म्हणून बिबट्या श्वानावर अचानक अटॅक करतो. बिबट्याने श्वानावर केलेला हल्ला पाहून आपल्यालाही धडकी भरते. श्वान सुरुवातीला बिबट्याच्या तावडीत सापडतो पण लगेच सुटतोही. हे वाचा - VIDEO - गाढ झोपलेल्या व्यक्तीला 2 महाकाय अजगरांनी घातला विळखा; भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद आता बिबट्याच्या कचाट्यात सापडल्यावर कुणीही घाबरेल आणि सुटल्यावर सर्वात आधी तिथून धूम ठोकेल. आपला जीव वाचवण्यासाठी पळेल. पण हा श्वान मात्र तिथून बिलकुल पळत नाही. छाती ताणून तो बिबट्याचा सामना करतो. बिबट्यावर तो भुंकत राहतो. त्याचं रूप पाहून बिबट्याही घाबरतो. तो आधी तसाच स्तब्ध उभा राहतो. श्वान इतक्या मोठमोठ्याने भुंकत राहतो. त्याच्या आवाजानेच बिबट्या घाबरतो. तो तिथून धूम ठोकतो. शिकारीसाठी आलेल्याला बिबट्यावर रिकाम्या हाती आल्या पावली परतण्याची वेळ ओढावते. तीन बिबट्यांवर भारी पडला एकटा कुत्रा याआधीही एका कुत्र्याने एक नाही तर चक्क तीन बिबट्यांना सरो की पळो करून सोडलं. कुत्रा आणि बिबट्यांचा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एका छोट्याशा कुत्र्याला तीन बिबट्यांनी घेरलं. पण एकाच्याही तावडीत ते सापडलं नाही. उलट कुत्र्यानेच या बिबट्यांना सरो की पळो केलं. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करतोय. कुत्रा आपला वेग इतका वाढवतो की बिबट्यालाही तो मागे टाकतो. त्यानंतर आणखी दोन बिबटेदेखील दिसतात. एकूण तीन बिबटे या छोट्याशा कुत्र्याला घेरतात. आता हा कुत्रा या बिबट्यांची शिकार होणार, तो काय त्यांच्या तावडीतून सुटत नाही असंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटेल. पण कुत्रा काही या बिबट्यांना घाबरत नाही. उलट तो त्या बिबट्यांनाच घाबरवण्याचा प्रयत्न करतो. जणू काही कुत्र्याच्या अंगात एका सिंहाचंच बळ येतं. कुत्र्याचं हे असं रूप पाहून बिबटेही हादरतात. कुत्रा एका बिबट्यावर जोरजोरात भुंकतो. त्यावेळी बिबट्या तिथून धूम ठोकून पळतो. कुत्रा त्याचा पाठलाग करतो. तर इतर दोन बिबटेही शांतच राहतात ते काही त्या कुत्र्याचा पाठलाग करत नाहीत. कुत्रा संधी साधून आपला मार्ग बदलतो आणि बिबट्यांच्या तावडीतून अगदी हुशारीनं आपली सुटका करून घेतो. हे वाचा - माकडांचा वर्ग झाला सुरू, तरुणाने शिकवलं अ..आ; मजेशीर Viral Video कित्येकदा एकाच बिबट्याच्या तावडीतून अशा छोट्या प्राण्यांची सुटका होणं शक्यच नसतं. पण जर हिंमत असेल आणि लढण्याची जिद्द असेल तर काहीही शक्य आहे हे या कुत्र्याने तीन तीन बिबट्यांना हरवून दाखवून दिलं आहे. हा व्हि़डीओ पाहून बिबट्याच्या हिंमतीला सर्वांनीच दाद दिली आहे.
First published:

Tags: Viral, Viral videos, Wild animal

पुढील बातम्या