Home /News /viral /

अचानक हलायला लागली झाडं; VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक

अचानक हलायला लागली झाडं; VIRAL VIDEO पाहून व्हाल अवाक

काही झाडांची पानं अचानक हालायला लागतात. हा व्हिडीओ पाहून अनेकजण अवाक झाले असून हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांकादेखील आश्चर्यचकित झाल्या आहेत.

    वॉशिंग्टन, 23 नोव्हेंबर : अनेकदा आपल्या आसपास अनेक विचित्र घटना घडत असतात. काहीवेळा या गोष्टींवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. आता सोशल मीडियावर अशाच प्रकारचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. टाइम्स लॅप व्हिडीओ (Time-Lapse Video) व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ (Video Viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ट्विटरवर आतापर्यंत 83 लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. या व्हिडिओमध्ये घरातील काही झाडे अचानक हलताना दिसून येत आहेत. या व्हिडिओत, काही झाडांची पानं अचानक हालायला लागतात. हा व्हिडीओ पाहून अनेकजण अवाक झाले असून हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 24 तासांत झाडे कशी हालचाल करतात याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ पाहून डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांकादेखील आश्चर्यचकित झाल्या आहेत. माय मॉडर्न मेटनुसार, हा व्हिडीओ सर्वात आधी ‘@मेलोरा_1’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. 12 सेकंदाच्या या व्हिडीओत क्लॉथिया प्रजातीची विविध रोपं दिवसभरात कशी हालचाल करतात ती कशी फुलतात आणि कोमेजतात हे या व्हिडीओत दिसून येतं. या झाडांजवळ एक घड्याळदेखील ठेवण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक तासाला झाडांमध्ये कसे बदल होतात हे दिसतंय. क्लॉथिया ही मारेंटेसी कुटुंबातील झाडांची प्रजाती आहे. अशा झाडांना "प्रार्थना वनस्पती" म्हणूनही ओळखलं जातं. ट्विटरवर हा व्हिडीओ 19 नोव्हेंबरला शेअर केला होता. आतापर्यंत 83 लाख लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. तसंच 87 हजार लाईक्स आणि 13 हजाराहून आधिक रिट्विट्स मिळाले आहे. या व्हिडीओने इवांका ट्रम्प आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांचे देखील लक्ष वेधून घेतले आहे. दोघांनीही हा व्हिडीओ लाईक केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी झाडांमध्ये जीव असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ खूपच दुःखदायक असल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Viral videos

    पुढील बातम्या