Home /News /viral /

किन्नौर दुर्घटना: दीपा शर्माची शेवटची पोस्ट व्हायरल; मृत्यूपूर्वी काढला होता हा फोटो

किन्नौर दुर्घटना: दीपा शर्माची शेवटची पोस्ट व्हायरल; मृत्यूपूर्वी काढला होता हा फोटो

दीपा शर्मा सोशल मीडियावर (Social Media) भरपूर प्रसिद्ध होती. ती पहिल्यांदाच एकटी प्रवासासाठी निघाली होती. सतत ती सोशल मीडियावर आपल्या या ट्रीपबाबतचे अपडेट देत होती.

    शिमला 26 जुलै: हिमाचलच्या (Himachal) किन्नौरमध्ये (Kinnaur) रविवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. रविवारी याठिकाणी दरड कोसळल्यानं (Landslide) सुट्टीची मजा घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका आयुर्वेद डॉक्टरचाही समावेश होता. दीपा शर्मा (Dr. Deepa Sharma) असं या युवतीचं नाव होतं. Watch Video: या जिगरबाजीला सलाम, महाभयंकर पूरस्थितीत अशी बजावली कामगिरी दीपा शर्मा सोशल मीडियावर (Social Media) भरपूर प्रसिद्ध होती. ती पहिल्यांदाच एकटी प्रवासासाठी निघाली होती. सतत ती सोशल मीडियावर आपल्या या ट्रीपबाबतचे अपडेट देत होती. मात्र, याची कोणालाही कल्पना नव्हती की ही ट्रीप तिच्यासाठी शेवटची ठरणार आहे. किन्नौरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत दीपा शर्मानं आपला जीव गमावला. रविवारी या दुर्घटनेच्या काही वेळ आधीच दीपा शर्मानं ट्विटरवर एक फोटो शेअर केला होता. तिनं लिहिलं होतं, की ती सध्या भारताच्या शेवटच्या टोकाजवळ उभा आहे. जिथपर्यंत नागरिकांना जाण्याची परवानगी आहे. यानंतर 80 किलोमीटर पुढे तिबेट आहे, ज्यावर चीननं कब्जा केला आहे. तिची ही शेवटची पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Dil toh baccha hain! लग्नातच नवरीची मस्ती; VIDEO जिंकतोय नेटकऱ्यांची मनं किन्नौरमध्ये ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. घटनेत सांगला-छितकुल रोडवर अचानक डोंगरावरील दगड कोसळू लागले. खाली येता येता या दगडांनी भरपूर नुकसान केलं. यादरम्यान खाली असलेला एक पुलही दगड पडल्यानं तुटला. पुलावर आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या काही गाड्यांवरही हे दगड कोसळले.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Himachal pradesh, Viral news

    पुढील बातम्या