मराठी बातम्या /बातम्या /Viral /विहीर खोदताना नशीब बदललं, हाती लागला 'नीलम', किंमत पाहून थक्क व्हाल!

विहीर खोदताना नशीब बदललं, हाती लागला 'नीलम', किंमत पाहून थक्क व्हाल!

श्रीलंकेची (Sri Lanka) जेम सिटी(Gem City) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नपुरा शहरात (Rathnapura City) एका व्यक्तीला घरात विहीर (Well) खोदताना अत्यंत मौल्यवान असे नीलम (Sapphire) रत्न सापडले आहे.

श्रीलंकेची (Sri Lanka) जेम सिटी(Gem City) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नपुरा शहरात (Rathnapura City) एका व्यक्तीला घरात विहीर (Well) खोदताना अत्यंत मौल्यवान असे नीलम (Sapphire) रत्न सापडले आहे.

श्रीलंकेची (Sri Lanka) जेम सिटी(Gem City) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नपुरा शहरात (Rathnapura City) एका व्यक्तीला घरात विहीर (Well) खोदताना अत्यंत मौल्यवान असे नीलम (Sapphire) रत्न सापडले आहे.

  रत्नपुरा, 29 जुलै : भगवान देता है तब छप्पर फाड के देता है किंवा एखाद्याचं नशीब फळफळतं तेव्हा रंकाचाही राव होतो, असं म्हणतात. याचंच उदाहरण देणारी एक अद्भूत घटना श्रीलंकेत घडली आहे. श्रीलंकेची (Sri Lanka) जेम सिटी(Gem City) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नपुरा शहरात (Rathnapura City) एका व्यक्तीला घरात विहीर (Well) खोदताना अत्यंत मौल्यवान असे नीलम (Sapphire) रत्न सापडले आहे. तब्बल 510 किलो वजनाचा हा नीलम रत्नाचा दगड असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत तब्बल साडे सात अब्ज रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. या नीलमच्या दगडाला सरेंडिपीटी सफायर(Serendipity Sapphire) असं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वीही रत्नपुरा शहरात अनेक मौल्यवान दगड सापडले आहेत. श्रीलंका जगातील नीलम आणि इतर मौल्यवान रत्नांचा मोठा निर्यातदार(Exporter) देश आहे.

  श्रीलंकेच्या राष्ट्रीय जेम्स अँड ज्वेलरी अथॉरिटीनं (एनजीजेए-NGJA) दिलेल्या महितीनुसार, 510 किलो वजनाचा आणि 25 लाख कॅरेटचा हा नीलम जगातील सर्वांत मोठा नीलम (World’s Largest Sapphire) ठरण्याची शक्यता आहे. अत्यंत मौल्यवान आणि दुर्मीळ प्रकारचं हे रत्न आहे.

  100 सेमी लांब, 72 सेमी रुंद आणि 50 सेमी उंच असं हे रत्न सध्या सुरक्षेच्या कारणास्तव बँक ऑफ सिलोनच्या (Bank of Silone) तिजोरीत ठेवण्यात आलं आहे, असंही ‘एनजीजेए’नं स्पष्ट केलं आहे.

  डॉ. गमागे यांच्या मालकीच्या जागेत हे रत्न सापडल्यानं तेच याचे मालक असून, याच्या खरेदीसाठी आतापासूनच परदेशातील खरेदीदारांनी बोली लावण्यास सुरुवात केली असल्याचंही ‘एनजीजेए’नं सांगितलं आहे.

  ज्या घरात विहीर खोदताना हे रत्न सापडलं त्या घराचे मालक डॉ. गामागे (नाव बदललं आहे) स्वत: मौल्यवान दगडांचे व्यापारी आहेत. विहीर खोदणाऱ्या मजुरानं त्यांना जमिनीखाली मौल्यवान दगड असल्याचं सांगितल्यानंतर डॉ. गामागे प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हा दगड व्यवस्थितरीत्या जमिनीखालून काढून घेतला आणि राष्ट्रीय जेम्स अँड ज्वेलरी अथॉरिटीला (NGJA) त्याची माहिती दिली.

  या दगडावरील सगळी घाण काढून टाकून तो चकचकीत करण्यास एक वर्षाचा कालावधी लागेल. त्यानंतरच त्याचं विश्लेषण करून त्याची नोंदणी केली जाईल. या दगडाची स्वच्छता करत असताना त्याचे काही बारीक तुकडे पडले त्यांचे विश्लेषण केलं असता, हे अतिशय उच्च दर्जाचं नीलम असल्याचं स्पष्ट झालं, असं डॉ. गमागे यांनी सांगितलं.

  First published:
  top videos