Home /News /viral /

बापरे! एका क्षणात खाली आले डोंगराचे दगड, भूस्खलनाचा थरारक VIDEO आला समोर

बापरे! एका क्षणात खाली आले डोंगराचे दगड, भूस्खलनाचा थरारक VIDEO आला समोर

या वेळी तिथून जाणाऱ्या काही स्थानिकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.

    मंडी, 05 सप्टेंबर : कोरोनासोबत उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये अस्मानी संकट ओढवलं आहे. कुठे महापूर तर कुठे भूस्खलन तर कुठे रस्त्ये-पूल खचताना दिसत आहेत. पुरामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील चंडीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी रात्री मंडई जिल्ह्याअंतर्गत दावडा नावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं. या भूस्खलनादरम्यान डोंगरावरचे मोठे दगडही महामार्गावर येऊन पडले. तिथली माती हटवल्यानंतर पुन्हा थोड्यावेळानं दगड कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग काहीवेळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हे वाचा-नागमोडी वळणावर ओव्हरटेक करायला गेला आणि घात झाला, अपघाताचा LIVE VIDEO या वेळी तिथून जाणाऱ्या काही स्थानिकांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या या भागात दगड आणि मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या पर्यायी मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश इथे वारंवार भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. मुसळधार पावसामुळे 28 ऑगस्ट रोजी चमोलीच्या पुरसारी भागात भूस्खलन झालं. त्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग गेल्या 17 तासांपासून बंद आहे. राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ पथक महामार्गावरील मातीचा ढिग बाजूला करण्यासाठी काम करत आहे. सध्या या महामार्गावरून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या