...आणि चक्क एका उंदराला सरकारनं दिलं गोल्ड मेडल, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

...आणि चक्क एका उंदराला सरकारनं दिलं गोल्ड मेडल, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक

लोकांना त्यांच्या शौर्यासाठी सुवर्ण पदके दिली जाणे देखील सामान्य आहे, मात्र आपण कधी उंदरला सुवर्ण पदक घेताना पाहिले आहे का?

  • Share this:

डोडोमा, 26 सप्टेंबर : याआधी तुम्ही अनेकदा खेळाडूंना गोल्ड मेडल मिळालेले पाहिले असले किंवा कधीकधी एखाद्याला अभ्यासासाठी किंवा कधी विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदक दिले जाते. लोकांना त्यांच्या शौर्यासाठी सुवर्ण पदके दिली जाणे देखील सामान्य आहे, मात्र आपण कधी उंदरला सुवर्ण पदक घेताना पाहिले आहे का? खरं तर, आफ्रिकन जातीच्या एका मोठ्या उंदराला शूरपणाबद्दल यूकेच्या संस्थेने सुवर्ण पदक दिले आहे. या उंदराने कंबोडियामध्ये 39 माइनचा शोध लावला. असे सांगितले जात आहे की त्याच्या कामादरम्यान या उंदराने 28 जिवंत स्फोटके शोधून हजारो लोकांचा जीव वाचवले. आफ्रिकेतील या उंदराचे नाव मागावा आहे, आणि तो सात वर्षांचा आहे.

वाचा-काचेचा तुकडा समजून दिला फेकून, तोच निघाला 9 कॅरेटचा हिरा! किंमत वाचून व्हाल शॉक

शुक्रवारी या उंदराच्या कार्यामुळे प्रभावित झालेल्या यूकेच्या एका संस्थेने त्याला गोल्ड मेडल दिले. मागावाला या कामासाठी चॅरिटी संस्था प्रशिक्षण दिले होते. मागावाने आपल्या कामाद्वारे कंबोडियातील 20 फुटबॉल मैदान (141,000 चौरस मीटर) क्षेत्राला लँडमाइन्स आणि स्फोटकांपासून मुक्त केले आहे. मागावाचे वजन 1.2 किलो आहे. त्यामुळे सुरुंगातून चालूनही त्यांचा स्फोट होत आहे. शोधकांच्या मदतीने सुमारे चार दिवसांत इतक्या मोठ्या भागाची तपासणी करू शकेल. यावेळी, त्याचे वजन देखील स्फोट होण्याची शक्यता असते.

वाचा-कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून तरुणाचा भन्नाट जुगाड, VIDEO पाहून व्हाल हैराण

ही संस्था देते उंदरांना प्रशिक्षण

या उंदरांना एपीओपीओ संस्था प्रशिक्षण देते. ही संस्था बेल्जियममध्ये नोंदणीकृत आहे आणि टांझानियाच्या आफ्रिकन देशात कार्यरत आहे. 1990 पासून ही संस्था मागावासारख्या विशाल उंदरांना प्रशिक्षण देत आहे. या संस्थेला उंदराचे प्रशिक्षण घेण्यासाठी एक वर्ष लागतो. त्यानंतर या उंदराला हिरो रॅटची उपाधी दिली जाते. हे उंदीर पूर्णपणे ट्रेंड आणि प्रमाणित झाल्यानंतर स्निफर कुत्र्यासारखे काम करतात.

Published by: Priyanka Gawde
First published: September 26, 2020, 7:33 PM IST
Tags: Viral

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading