Home /News /viral /

सायकलस्वाराच्या जवळून जाणं Land Rover मालकाला पडलं महागात, भरावा लागला 99 हजारांचा दंड

सायकलस्वाराच्या जवळून जाणं Land Rover मालकाला पडलं महागात, भरावा लागला 99 हजारांचा दंड

दुचाकीस्वाराच्या हेल्मेट कॅमेऱ्यानं या लँड रोव्हचं फुटेज घेतलं होतं. पॉल निगेल मायली (52) हे लँड रोव्हर चालवत होते. सिंगल ट्रॅक रोडवर त्यांनी सायकलस्वारांच्या ग्रुप खूप जवळून चारचाकी चालवली.

    लंडन, 19 एप्रिल : वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे अनेकदा मोठे अपघात घडतात. तरीही हे नियम पाळण्याचा लोक कंटाळा करतात. ट्रॅफिक पोलीस (Traffic rules) अशांवर करडी नजर ठेवून असले तरी सोयीस्कर परिस्थिती पाहून जवळपास सर्वच जण कोणता ना कोणता नियम मोडतातच. अशी सवय अंगवळणी पडल्यानंतर एखाद्या वेळस तरी एक तर दंडाच्या रूपात किंवा अपघाताच्या रूपात नुकसान भोगावं लागू शकतं. एका 52 वर्षीय व्यक्तीला नुकताच चुकीच्या पद्धतीने सायकलच्या जवळून जाण्यामुळे जबर दंड सोसावा लागला आहे. या व्यक्तीनं त्याच्या नवीन लँड रोव्हर (Land Rover Car) कारमधून कंट्री लेनमधून जात असलेल्या सायकलस्वारांच्या गटाच्या अगदी जवळून जाण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एक सायकलस्वार खड्ड्यात पडला. मात्र, सुदैवानं तो बचावला. तो काही प्रमाणात जखमीही झाला. प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर लँड रोव्हरच्या मालकाला एक हजार पौंड (भारतीय रुपयांमध्ये 99 हजार 270 रुपये 32 पैसे) दंड भरावा लागला. अशा पद्धतीने ब्रिटनमध्ये वाहतुकीचे नियम मोडणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. हे वाचा - रशियन सैन्याकडून 155 युक्रेनियन नागरिकांचं अपहरण; जाणून घ्या 10 महत्त्वाचे अपडेट दुचाकीस्वाराच्या हेल्मेट कॅमेऱ्यानं या लँड रोव्हचं फुटेज घेतलं होतं. पॉल निगेल मायली (52) हे लँड रोव्हर चालवत होते. सिंगल ट्रॅक रोडवर त्यांनी सायकलस्वारांच्या ग्रुप खूप जवळून चारचाकी चालवली. हे फुटेज नॉर्थम्प्टनशायर पोलिसांच्या ऑपरेशन स्नॅपला पाठवण्यात आले. हे प्रकरण गेल्या वर्षीच्या 11 जूनचं आहे. या लँड रोव्हर चालकाला नॉर्थम्प्टनशायरच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने आता बेपर्वा वाहन चालवल्याबद्दल दंड ठोठावला आहे. हे वाचा -PM मोदींना पत्र लिहिणं पाकिस्तान पंतप्रधानांच्या अंगाशी, स्वतःच्या देशात ट्रोल पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी हे फुटेज सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर आरोपीची ओळख पटू शकली. मात्र, सोशल मीडियावर अनेक युजर्सनी लँड रोव्हरच्या मालकाचा बचाव केला आहे. ते म्हणतात की, लँड रोव्हर चालवणाऱ्या माणसाने सायकलस्वारासाठी बरीच जागा सोडली होती. अशा स्थितीत केवळ एकतर्फी कारवाई करणे योग्य नाही. लँड रोव्हर रेंज रोव्हरची किंमत 2.31 कोटींपासून सुरू होते आणि 3.41 कोटींपर्यंत जाते. लँड रोव्हर रेंज रोव्हर 16 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे - रेंज रोव्हर 3.0 आय डिझेल एसईचे बेस मॉडेल आणि टॉप व्हेरिएंट लँड रोव्हर रेंज 4.4 आय पेट्रोल LWB पहिली आवृत्ती 3.41 कोटी इतक्या किमतीचं आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Britain, Traffic Rules, Video viral

    पुढील बातम्या